संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ मुळशीत संजय राऊतांची तोफ धडाडणार, महाविकास आघाडीच्या एकाच दिवशी दोन दिग्गजांच्या सभांनी भोर मतदार संघ दणाणून जाणार

पौड : भोर मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ भोरमध्ये सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार तर मुळशीत दुपारी 2 वाजता शिवसेनेचे प्रक्क्ते, खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडणार आहे.

रविवारी भोरमध्ये उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची सभा सुरू असतानाच हॅटट्रिक आमदार यांनी मुळशीतील घोटावडे फोट्याजवळील सभास्थळला भेट दिली. सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची पहाणी त्यांनी केली.यावेळी मोठया संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शरद पवार आपल्या सभेत अजीत पवार यांनी केलेल्या टिकेला काय समाचार घेणार याकडे सार्‍या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराची सांगता मुळशीतील सभेने होणार आहे. या सभेत मुलुख मैदानी तोफ असणारे संजय राऊत महायुतीवर टिकास्त्र सोडणार याकडे यार्‍या महाराष्ट्राचे लक्ष असेल.
भोर मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा नियोजनबद्ध प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या दोन दिग्गज नेत्यांच्या सभा एकाच दिवशी दोन वेगवेगळया तालुक्यात होत आहेत. त्यामुळे या सभामुळे भोर मतदार संघातील वातावरण थोपटेमय होणार असल्याचे चित्र आहे. वस्ताद भोरच्या मैदानात अशी पवार यांच्या सभेची क्लिप मतदारसंघात वायरल झाल्साने 23 नेाव्हेंबरचा निकाल 23 नोव्हेंबरला सभेच्या गर्दीतून दिसेल अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

सुरुवातीपासूनच थोपटे यांनी आपल्या नियोजन बद्ध प्रचाराने तीनही तालुक्यात आघाडी घेतली असताना सोमवारी ता.18 रोजी सकाळी भोर मध्ये कापूरहोळ येथे पुणे सातारा हायवेवर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सभा होणार आहे तर मुळशीतील शिवसैनिकांना गेल्या अनेक दिवसांची परीक्षा होती. अशा उद्धव ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या संजय राऊत यांची मुळशीच्या कासार आंबोलीत सुंदरबन मंगल कार्यालयात सभा दुपारी 2 वाजता होणार आहे. या सभेतून हे दोनही दिग्गज नेते काय बोलणार याची मतदारांना उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्रगट व उद्धव ठाकरे शिवसेना गटाने सुरुवातीपासूनचं थोपटे यांच्या पाठीशी ताकद उभी केलेली असताना एकाच दिवशी या दोन नेत्यांची दोन ठिकाणी होत असलेल्या सभांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हमून थोपटे यांना मोठी ताकद मिळणार आहे.
भोर-राजगड-मुळशी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या कार्यकर्त्यांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक जीवाचे रान करून मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. काहीही झाले तरी थोपटे यांना मुळशीतून मताधिक्य मिळवून द्यायचेच या हेतूने आघाडीच्या कार्यकर्त्यानी एक विचाराने नियोजनबद्ध असा प्रचार सुरु केलेला आहे.
See also  भोरमध्ये चौरंगी लढत ? थोपटे, कोंडे, मांडेकर, दगडे मैदानात