भोरच्या सभेत शंकर मांडेकरांनी डागली संग्राम थोपटेंवर तोफ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचेनी काढले संग्राम थोपटेंच्य निष्क्रियतेचे वाभाडे

भोर: भोर, वेल्ह्यतले रस्ते बघितले की इथं यायची लाज वाटते. पंधरा वर्षे सत्ता असून विकासकाम करता आली नाहीत, तुम्ही कस सहन करता असा खडा सवाल भोर विधानसभेतल्या मतदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. इथली वाईट परिस्थिती पहिली की तुमच्या सहनशक्तीला साष्टांग दंडवत घालावा वाटतो, असे म्हणत आमदार संग्राम थोपटे यांच्या निष्क्रियतेचे वाभाडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांचा प्रचारार्थ भोरे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. सभेपुर्वी भोर मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करून शंकर मांडेकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, रेवननाथ दारवटकर, भगवान पासलकर, किरण राऊत, शंकर भुरुक, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, किरण राऊत, अंकुश मोरे, शांताराम इंगवले, बाळासाहेब चांदेरे, राजाभाऊ हागवणे, सुनील चांदेरे, प्रमोद निम्हण, नितीनबापू थोपटे, श्रीकांत कदम, यशवंत डाळ, निर्मलाताई जागडे, कीर्ती देशमुख, पुनम विधाते, सारिका मांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की ” भोरचे रस्ते आणि बस स्थानक बघितल्यानंतर लाज वाटते, राजगड कारखान्यात ऊसाला योग्य तो दर मिळत नाही तरी मतदार हे सहन कसं करतात असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. एवढी सहनशीलता मी कोणत्याही मतदारसंघात बघितली नाही. इथल्या कार्यकर्त्यांचा, मतदार संघाचा आमदारांनी कधी विचार केला नाही. सत्ता असूनही आमदारांना मतदार संघाचा विकास का करता आला नाही.
शंकर मांडेकरांना निवडून द्या भोर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायची जबाबदारी हा दादाचा शब्द आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी मतदारांना दिली. मतदारसंघातील किल्ल्यांचा संवर्धनाचा आराखडा तयार करत आहे निवडणुकीनंतर त्या कामाला सुरुवात करणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात भकास तालुके म्हणून भोर वेल्हा हे ओळखले जातात. तुम्हाला राग कसा येत नाही. असा सवाल करत अजित पवार म्हणाले की पंधरा वर्षात इथल्या आमदारांनी जेवढा निधी आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी हा पुढच्या पाच वर्षात आणेल. यांना कारखाना चालवता आला नाही, एमआयडीसी मध्ये आलेल्या कंपन्या बंद पडल्या. मग यांनी एवढी वर्ष केलं काय? तर हा तालुका भकास करण्याचं काम केलं. त्यामुळं विकासासाठी आता परिवर्तन घडवा.
*चौकट*
*महाराजांना काय वाटत असेल..?*
हा सगळा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने त्यांच्या कार्यकर्तृत्ववाने उभा राहिला आहे. त्यांना वरतून पाहताना काय वाटत असेल? माझ्या काळात कसं होत, आता हे काय झालं आहे, असा विचार ते करत असतील. तुम्हाला कसं बघवय हे. म्हणून मी सांगतोय आता तरी सुधरा असेही अजित पवार म्हणाले.
भोरच्या सभेत शंकर मांडेकरांनी डागली संग्राम थोपटेंवर तोफ.
आपल्या मतदार संघाचा विकास करणे हे आमदारांचे कर्तव्य असते. पण यांनी नुसता सत्तेचा उपभोग घेतला.चांगलं नेतृत्व नसल्याने हा मतदार संघ भकास झालाय, अशी टीका करत शंकर मांडेकर यांनी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केलं. मी आठवड्यातले चार दिवस या दोन तालुक्यासाठी देईल, आणि तुम्हाला बदल घडवून दाखवेल हा माझा शब्द आहे. फक्त एकदा कामाची संधी द्या असेही मांडेकर म्हणाले.
See also  आमदार संग्राम थोपटे या वेळी सरकारच्या गाडीत दिसणार – संजय राऊत, प्रचाराच्या सांगतेत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ मुळशीत धडधडली