हे तर ७/१२ सम्राट आमदार.l, संतप्त नागरिकांनी किरण दगडे पाटलांना ऐकवले थोपटेंचे प्रताप

महावार्ता न्यूज: भोर ताुक्यातील दौऱ्यात किरण दगडे पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मात्र या दरम्यान धांगवडी गावातील लोकांनी आमदार संग्राम थोपटे यांचे प्रताप ऐकवल्याने दगडे पाटील यांनी हळहळ व्यक्त करत ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले.
        गावात शाळा होत नाही पण राजगड ज्ञानपीठसाठी मात्र जागा सर्व शासकीय कार्यालयामधील यंत्रणा वापरून मिळवली जाते. २०१४ ला आश्वासन दिले त्यानंतर आमदार कधी गावात आलेच नाहीत, त्यांना गावात का यायचे नाही? गावच्या समस्या का सोडवत नाही…? असा संतप्त सवाल थोपटेंविरोधात करत एका ग्रामस्थाने किरण दगडे पाटील यांना गावभेट दौऱ्यावेळी हा प्रकार कथन केला.
       राजगडचे महाविद्यालय होते मात्र गावासाठी शासकीय माध्यमिक विद्यालयाला जागा मिळत नाही, ग्रामपंचायत ठराव नसताना यांना जागा कशी मिळते. १९९८ ला यांची फाईल बंद झाली होती, मग २००० साली कशी काय ऑर्डर झाली. एक उड्डाणपूल त्यांनी केला आहे, तो गावचा फाटा सोडून पुढे शिवेच्या रस्त्यावर बांधला आहे. हायवे कमिटीने सांगितले आहे की हा पूल वाहतुकीसाठी योग्य नाही. काळेवाडी, केंजळ, इंगवली या तिन्ही गावात आमदारांच्या जमिनी आहेत, त्याला संलग्न हे त्यांचं महाविद्यालय आहे आणि तो पूलदेखील संलग्न आहे.
      राजगड कारखान्याच्या पुलाला मंजुरी नसताना, तो केवळ अंडरपास असताना तो एवढा मोठा पूल होतो. साध्या एमडीच्या पत्रावर उड्डाणपूल होतो. आम्हाला गावात मात्र दीड किलोमीटर लांबून यावं लागतंय, महिलांना खूप त्रास होतोय, जाता येत नाही, हे प्रश्न काँग्रेसच्या आमदारांनी निर्माण केले आहेत. त्यामुळे आमदार आमच्या गावात येत नाही.
        ७.५ एकराची गावठाण विस्तार योजना होती, ११० प्लॉटस् त्यांचे पडले आहेत. मोजणी व नकाशे झाले आहेत. त्यामुळे गावात जागाच शिल्लक नाही. त्यामुळे गावठाण विस्तार योजनाच गायब केली. आम्ही आमचा कायदेशीर लढा चालू आहे. कलेक्टरपुढे सुनावणी चालू आहे.
         गावासाठी शाळेची मागणी केली तिथं शाळा न करता भोंगवलीला शाळा केली. त्यांचे कार्यकर्ते छुप्या मार्गाने येतील आणि मतदान करा म्हणतील. पण गावातील लोकांनीच ठरवा त्यांना मतदान करायचे का? हे कसले कार्यसम्राट आमदार हे तर ७/१२ सम्राट आमदार म्हणत ग्रामस्थांनी थोपटे यांच्यावर संताप व्यक्त केला. तसेच सर्व ग्रामस्थांनी किरण दगडे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आम्हाला किरण दगडे पाटील यांच्या रूपाने चांगले नेतृत्व मिळालेले असून यापुढे आम्ही किरण दगडे पाटील तुम्हीच आमचे नेते म्हणून घेणार आहोत आणि त्यांच्या मागेच उभे राहणार आहोत असे येथील महिला आणि आबालवृद्धांनी किरण दगडे पाटील यांना सांगितले.
See also  आमदार संग्राम थोपटे या वेळी सरकारच्या गाडीत दिसणार – संजय राऊत, प्रचाराच्या सांगतेत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ मुळशीत धडधडली