आमदार थोपटे यांच्या प्रचारासाठी मशालीचे शिवसैनिक आघाडीवर, राष्ट्रवादीकडूनही लोकसभेसारखाच दमदार प्रचार

पौड : भोर-राजगड-मुळशी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या कार्यकर्त्यांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक जीवाचे रान करून मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. काहीही झाले तरी थोपटे यांना मुळशीतून मताधिक्य मिळवून द्यायचेच या हेतूने आघाडीच्या कार्यकर्त्यानी एक विचाराने नियोजनबद्ध असा प्रचार सुरु केलेला आहे.
मुळशीत गेल्या 3 विधानसभेत चढत्या क्रमाने हॅटट्रिक आमदार संग्रा थोपटेंना मताधिक्य लाभले आहे. यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट एकदिलाने प्रचाराच्या मैदानात उतरला आहे.

शरदचंद्र पवार गटाचे नेते महादेव अण्णा कोंढरे यांची जनमाणसातील प्रतिमा, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता दगडे यांचा दांडगा जनसंपर्क, बाबाजी शेळके, अंकुश वाशिवले, भरत सातपुते, भुगावचे दगडू काका करंजावणे, पिरंगुटचे राहुल पवळे, अंकुश साठे, दत्ता दहिभाते, बंडू मेंगडे, विजय ऐनपुरे, महादेव गोळे, जर्नादन मातेरेसह गौरी भरतवंशी, दिपाली कोकरे, स्वाती वासिवले, रूपाली अमराळे, सारिखा शिंदे, शितल अमराळे च्यासारखे धडाडीच्या कार्यकर्त्यांनामनापासूनची साथ यामुळे त्यांच्या पक्षातील पुढची फळी देखील जोरदार प्रचारात उतरलेली दिसत आहे. सुप्रियाताई सुळे यांना भोर मतदारसंघात 43 हजारांचे लीड मिळवून दिले होते, आता आमदार थोपटेंना यांना 50 हजारांचे मताधिक्य देण्यासाठी पवार साहेबांची राष्ट्रवादी सज्ज झाली असल्याचे जिल्हा अध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशात उबाठा गटाच्या शिवसेनेचाही सिंहाचा वाटा होता. शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या प्रेमाखातर ही मंडळी त्यांच्यासोबत जातील असा अंदाज बांधला जात होता परंतु उबाठा गटाचे कार्यकर्ते अद्याप तरी हे शिवसैनिक आघाडीबरोबरचं टिकून राहिले व त्यांनी थोपटे यांच्या प्रचारात एक पाऊल पुढे ठेवून प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे, जेष्ठ नेते नानासाहेब शिंदे, अविनाश बलकवडे, स्वातीताई ढमाले,सागर काटकर,सचिन साठे, प्रकाश भेगडे,भानुदास पानसरे, संतोष मोहोळ,राम गायकवाड, माऊली केमसे, नागेश साखरे, बाळासाहेब भांडे, ज्ञानेश्वर डफळ,कैलास मारणे या आघाडीच्या शिलेदाराबरोबरचं उबाठा गटाचे गावोगावचे सैनिक पेटून उठलेले आहेत. हेच चित्र भोर व राजगड या दोनही तालुक्यात असल्याचेपहायला मिळत आहे. उबाठा हीच खरी शिवसेना असल्याने मुळशीतील शिवसैनिक हे महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहेत. खासदार सुप्रिया ताई यांना जशी साथ दिली तसेच उबाठा गटाच्या शिवसेना गटाचे मतदान आमदार संग्राम थोपटेंला होणार असल्याचा निर्धार मुळशीतील सच्च्या शिवसैनिकांनी केला असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी सांगितले आहे.
See also  पौड पोलीसांकडून शासकीय कार्यालयासह एसटी स्टँड परिसर चकाचक , गुन्हेगारांची सफाई करणार्‍या हातात दिसला झाडू