मुळशीसह भोरमधील उमेदवार प्रतिनिधीवर गोपनीयतेचा भंग केल्याने गुन्हा दाखल

पुणे : भोर विधानसभा मतदारसंघामध्ये गोपनीयतेचा भंग केल्याने उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर व अपक्ष उमेदवार कुलदिप कोंडे यांच्या प्रतिनिधींनी मॉकपोलचे शुटींग करुन ते सोशल मिडीयावर प्रसारीत केल्या गोपनियतेचा भंग झाल्याने भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोरमध्ये 564 मतदान केंद्र असुन निवडणूक मतदान प्रक्रियेचे कामकाज सरदार कान्होजीजेधे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत येथे सुरु आहे. यावेळी निवडणूक  अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रतिनिधी यांना कोणताही मोबाईल, स्मार्टबॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येणेस बंदी आहे. तरीही बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन येऊन उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचे प्रतिनिधी म्हणुन विजय हनुमंत राऊत, रा.लवळे ता.मुळशी जि.पुणे व श्री. कुलदिप सुदाम कोंडे यांचे प्रतिनिधी म्हणुन नारायण आनंदराव कोंडे रा.केळवडे ता.भोर जि.पुणे यांनी मॉकपोलचे शुटींग करुन ते सोशल मिडीयावर प्रसारीत करुन गोपनियतेचा भंग केला. या दोन्ही प्रतिनिधीवर भोर पोलीस स्टेशन गु.र.नं.222/2024, बी.एन.एस.171(1), 223, आय.टी.अँक्ट 72 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र मध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचे वापरावर कडक बंदी घालणेत आली आहे. अशाप्रकारे व्हिडीओ तयार करणे व ते व्हिडीओ विविध व्हॉटसअप ग्रुप , समाज माध्यमावरती प्रसारीत करणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करणेत येईल अशी माहिती डॉ.बिकास खरात, निवडणूक निर्णय अधिकारी 203- भोर विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.
सदर घटनेचे गांर्भीय विचारात घेता जिल्हाधिकारी सुहास दिवसे व  जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देवून माहिती घेतली आहे. 
See also  मुळशीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी,  115 वाहनांचे तपासणी, एक लाखांची रोकड जप्त