पेरिविंकलच्या सुस शाखेतील 10, 12वी  विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभ उत्साहात संपन्न 

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सूस शाखेत शनिवार इ 10वी व 12वी च्या विद्यार्थांच्या  निरोप समारंभाचा कार्यक्रम  उत्साहात व थाटात संपन्न झाला.
इ 9वी व 11वी च्या विद्यार्थ्यांनी इ 10वी व 12वी च्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे घालून व पारंपरिक औक्षण करून विद्यार्थ्यांसाठी या खास “शाही-निरोपसमारंभाचे” आयोजन केले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सायबर सेल व सायबर सिक्युरिटी चे सायबर क्राईम ब्रांच – पुणे येथील अधिकारी श्री अनिल जायपत्रे व त्यांच्या बरोबर पोलीस कॉन्स्टेबल अनिल पुंडलिक यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या  प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे व सर्व विद्यार्थ्यांचे  उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.
यावेळी शाळेतर्फे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल- श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यार्थांनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दलचे त्यांचे मनोगत व्यक्त केले.आनंद व दुःख या दोन्ही समिश्र भावना व शिक्षकांप्रती असलेला आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच इ 10वी व 12वी च्या वर्गशिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मयीता व्यक्त करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , मान्यवरांचे व सर्व स्टाफचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या व यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुस ब्रांच सज्ज असल्याची ग्वाही दिली.
संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी सर्व विद्यार्थ्यांना जीवनाच्या पेपर मध्ये यशस्वी होऊन उंच शिखर गाठा व शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करा असा मोलाचा संदेश सर्वांना दिला.
तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना फेटे परिधान केलेले बघून सदैव अशीच मान फेट्याच्या तुऱ्याप्रमाणे तुऱ्याप्रमाणे ताठ व उत्तुंग यश संपादन करणारी असो असे सांगून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होताना खूप समाधान वाटते असे सांगून जगाच्या पाठीवर कोठेही जा पण शाळेला आणि शिक्षकांना कधी विसरू नका व जीवनाच्या प्रवासात पुढे जातांना कधीही पेरिविंकल कडून कुठलीही मदत लागली तर निसंकोच या असे प्रतिपादन केले. तसेच आयुष्यात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कुठलेही काम व कुठलीही परीक्षा कठीण नाही सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाळेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला.
तसेच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सायबर क्राईम शाखेचे अधिकारी श्री अनिल जायपत्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सोशल मीडिया, फेसबुक, वॉट्सअँप याबद्दल नकळत होणारे गुन्हे व हे जाळे किती खोलवर असते व याचा अतिरिक्त वापर कसा टाळावा याची माहिती दिली तसेच सोशल मीडियाच्या अति आहारी गेल्याने कुठले गुन्हे नकळत कसे घडू शकतात याची सर्व विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देऊन सायबर लॉ व सायबर सिक्युरिटी याबद्दल जागरूकता प्रत्येकाने घेणे ही काळाची गरज आहे असे सांगून भावी परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक शुभा कुलकर्णी व सचिन खोडके व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने तसेच इ 9वी व 11वी च्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. इ 10वी व 12वी च्या वर्गशिक्षिका योगिता धाने, वैशाली घाडगे व अंकिता शाह यांनी कार्यक्रमात मोलाचा वाटा दर्शवला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील यांनी केले होते.
See also  पौड पोलीसांकडून शासकीय कार्यालयासह एसटी स्टँड परिसर चकाचक , गुन्हेगारांची सफाई करणार्‍या हातात दिसला झाडू