राष्ट्रीय स्पर्धेत आयुषा इंगवलेला कांस्यपदक, मुळशीतील सुवर्णकन्येची सलग सहाव्यांदा पदकाची विक्रमी कामगिरी

महावार्ता न्यूज: मुळशीतील भूगावमधील सुवर्णकन्या आयुषा प्रमोद इंगवलेने वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. सलग 6 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आयुषाने नोंदवून मुळशीची शान देशात उंचावली आहे. 
मध्यप्रदेशमधील देवास शहरात संपलेल्या स्पर्धेत
महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करताना आयुषा इंगवलेने एकेरीत पदकाची कमाई केली. पश्चिम बंगालला 3-0, चंदीगडला 3-1 तर आंध्र प्रदेशला 3- 1 गुणांनी पराभूत करीत कांस्यपदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले. स्पर्धेत 23 राज्याच्या संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल आयुषाची उत्तराखंडला होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सलग 6 जिंकण्याचा विक्रम आयुषाने केला आहे.
आयुषा ही सर परशुराम महाविद्यालयात 12 वित शिकत असून तिला विल्सन अँडरीव यांचे मार्गदर्शन मिळत आहे
See also  महाराष्ट्राला १४ वर्षांनी सांघिक जिम्‍नॅास्टिक्समध्ये यश, ज्युनियरमध्ये एक सुवर्णासह रौप्य, सिनियरमध्ये कांस्य