मराठी राजभाषा, विज्ञान दिन पेरीविंकलच्या सर्व शाखेत उत्साहात साजरा
महावार्ता न्यूज ः पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड, पिरंगुट, बावधन व सुस या सर्व शाखेत मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन याचे औचित्य साधून “आमची पेरिविंकलची विज्ञान नगरी” या खास विज्ञान प्रदर्शन व आपली संस्कृती याचे प्रदर्शन घडवून विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाखांमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विज्ञानदिनानिमित्त व मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व शाखांमध्ये वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज व सी. व्ही. रमण यांच्या फोटोचे पूजन करून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पिरंगुट माजी उपसरपंच राहुल पवळे, पत्रकार सचिन विटकर, सौं सुषमा माढेकर,सौ मोनाली ढोरे (मा. उपसरपंच पौड ) तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल आदी मान्यवारांच्या उपस्थितीत सर्व शखांच्या मुख्याध्यापकांसमवेत करण्यात आले. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमा नंतर पाहुण्यांनी कुतुहलाने सर्व प्रयोग पाहिले. विद्यार्थ्याना प्रश्न विचारून त्यांनी प्रयत्न पूर्वक तयार केलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली.
इयत्ता पहिली पासून ते आठवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग निहाय गट करून आपल्या विज्ञान पुस्तकावर आधारित विविध प्रकल्प आपापल्या शास्र शिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि लहान मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने केले. सर्व विद्यार्थ्यांनीच आपले प्रदर्शन जास्तीत जास्त चांगले कसे होईल यासाठी खूप प्रयत्न केले होते व ते प्रयत्न त्यांच्या प्रकल्पा मधून दिसून येत होते. आजच्या या विज्ञान प्रदर्शनात सोलार एनर्जी ,चंद्रयान,टाइप्स ऑफ ग्रेन्स, दिगेस्डीव सिस्टीम, पाणी शुद्धता प्रकल्प, प्रकाशाचे परिवर्तन, वाहतूक दिवे आणि व्यवस्था, जंक फूड आणि आरोग्यदायी पोषक अन्न, प्राणी सृष्टी आणि वनस्पती अशा अनेक विषयांचा समावेश विद्यार्थ्यांनी आजच्या या प्रकल्पात केला होता. सुमारे 885 प्रकल्पांचा सहभाग आजच्या पेरिविंकल च्या या विज्ञान नगरीतल्या प्रदर्शनात होता हे वैशिष्टच म्हणावे लागेल.तसेच इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त भारतीय उष्ण्देशीय मौसम विज्ञान संस्थेला तसेच सुस मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पाषाण येथील आयसर (IISER ) या मोठ्या विज्ञान संशोधन संस्थेला भेट देऊन सेमिनार अटेंड करून खरे शास्त्रज्ञ यांना भेटून त्यांच्याशी रिसर्च आणि डेव्हलपमेंट या विषयावर चर्चा केली.विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी याचा नक्कीच हातभार लागेल.व या पेरिविंकल च्या विज्ञान नगरितुनच उद्याचे भावी शास्त्रज्ञ तयार होतील असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे मुख्याधापक डॉ. अभिजीत टकले, स्वाती कोल्हे तसेच निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख पूनम पांढरे, सना इनामदार, प्राजक्ता वाघवले, ऋचा हल्लूर, इंदू पाटील, रश्मी पाथरकर, कल्याणी तसेच पल्लवी नारखेडे, शुभा कुलकर्णी, सचिन खोडके यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने करण्यात आले होते. या पेरिविंकल च्या विज्ञान नगरितील विज्ञान प्रदर्शन बघायला सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.