पुणे : भारतीय हौशी जिम्नॉस्टिक्सअसोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्नॉस्टिक्स असोसिएशनच्या आयोजित राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॉस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्रसंघाने विजेतेपद पटकाविले. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार्या या लढतीतमहाराष्ट्राने १२७.२५ गुणांनी सोनेरी यशाला गवसणी घातली. महिलांच्या वरिष्ठ गटातीलअसमांतर बार्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटिल हिने कांस्यपदक जिंकले.
बालेवाडीतीलश्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी ही स्पर्धा पार पडली. महिलांच्या आर्टिस्टिक जिम्नॉस्टिक्समधील वरिष्ठ गटाच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी थरारक लढतीत बाजी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मुंबईच्या अनुष्का पाटील व इशिता रेवाळे,ठाण्याची सारा राऊळ, पुण्याची शताक्षी टक्के, संभाजीनगरची रिद्धी हत्तेकर व मुंबईचीरुजुल घोडके यांनी महाराष्ट्राला हे सुवर्णयश मिळवून दिले. या गटात यजमान महाराष्ट्राला रेल्वेच्या मुलींनी तोडीस तोड लढत दिली. स्पर्धेचा पदक वितरण समारंभ ऑलिम्पिकपटूदिपा कर्माकर व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधिर मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र हौशी जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विश्वेश्रर नंदी, मकरंद जोशी व स्पर्धा संचालक प्रवीण ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अखेरच्याक्षणापर्यंत रेल्वेचा संघचं २ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, त्यांची एक खेळाडू बॅलन्स करताना खाली पडली अन् हीच गोष्ट महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेशीठरली. रेल्वेला १२७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालने ११५.५५गुण मिळवित कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या वरिष्ठ गटात असमांतर बार्स प्रकारात महाराष्ट्राच्याअनुष्का पाटील हिने ९.४३३ गुणांसह कांस्यपदक जिंकले. या प्रकारात रेल्वेच्या करिश्माचाकरिश्मा बघायला मिळाला. तिने निर्विवाद वर्चस्वासह १०.५०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावरआपला हक्क सांगितला. दिल्लीची स्नेहा तारियल रौप्यपदकाची मानकरी ठरली.
साक्षी दळवीचा पदकांचा चौकार
आर्टिस्टिक जिम्नॉस्टिक्स ज्युनियरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ठाण्याच्या साक्षी दळवीने महाराष्ट्रालाचार पदके जिंकून दिली. तिने वैयक्तिक ऑल राऊंड, फ्लोअर एक्सरसाईज व युनेवन बार्स याप्रकारात रौप्यपदकांची कमाई केली, तर वार्ल्टींग टेबल प्रकारात कांस्यपदकाला गवसणीघातली. वैयक्तिक ऑल राऊंड प्रकारात साक्षी दळवीने ४०.७५० गुणांसह रौप्य पदकाची कमाईकेली. वॉल्टिंग टेबल व युनेवन बार्स या प्रकारात सरस कामगिरी केल्यानंतर बॅलन्सिंगबीम्स व फ्लोअर एक्सरसाईज या प्रकारात पिछाडीवर राहिल्याने तिला सुवर्णपदकाने थोडक्यातहुलकावणी दिली. त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने अखेरच्या क्षणी मुसंडी मारत ४२.४००गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. पहिल्याच स्पर्धेत तिने हे सुवर्ण यश संपादनकेले, गुजरातच्या अवंतिका नेगी हिने ४०.६५०गुण मिळवित कांस्यपदकावर हक्क सांगितला. युनेवन बार्स प्रकारात साक्षीने ८.२६७ गुणांसहरौप्यपदक पटकाविले. गुजरातच्या अवंतिका नेगीने ९.०६७ गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली.गुजरातचे स्पर्धेतील हे एकमेव सुवर्णपदक ठरले. कर्नाटकच्या निह वार्गेस हिने कांस्यपदक जिंकले. फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात साक्षी दळवीने १० गुणांसह रौप्यपदकाला गवसणी घातली.त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने १०.३०० गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर ९.६०० गुणांचीकमाई करणारी तमिळनाडूची ओकेना थॉमस कांस्यपदकाची मानकरी ठरली. वाल्टिंग टेबल प्रकारातसाक्षी दळवीला ११.७०० गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्रिपुराची श्रीपर्णादेबनाथ ११.८०० गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तर पश्चिम बंगालच्या तोरा सानी हिने११.७३३ गुणांसह रौप्यपदक जिंकले.
महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांचा मान
यजमान महाराष्ट्राने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्णांसह ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण सर्वाधिक १५पदकांची लयलूट केली. मात्र, रेल्वेने ४ सुवर्ण, ६ रौप्य व २ कांस्य अशी एकूण १२ पदकांसहगुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राचा संघ सातव्यास्थानी राहिला. सेनादलाने ४ सुवर्ण, ४ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण ११ पदके जिंकून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. पश्चिम बंगाल ४ सुवर्ण ३ रौप्य व ३ कांस्य अशा एकूण १० पदकांसह तिसर्या स्थानी राहिला.