मुळशी: धनवेवाडी ता. मुळशी येथे ब्रह्माकुमारीज च्या हृदय मोहिनीवन रिट्रीट सेंटर, विश्व मातृत्वदिना मातृत्वोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .
या उत्सवात विविध उपक्रमांच्या माध्यमाने ईश्वर पारलौकिक माता, प्रजापिता ब्रह्मा अलौकिक माता,भारत माता , प्रकृती माता, लौकिक माता, इत्यादी सर्व आईंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . यामध्ये
आई प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कविता , गीत , नृत्य , खेळ, प्रश्न मंजुषा इत्यादी द्वारे आई ची महिमा चे वर्णन केले गेले .
आलेल्या सर्व मातांचा सन्मान करून त्यांना ईश्वरीय भेट देण्यात आली .
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका रुक्मिणी दीदी यांनी विश्व नव निर्मिती साठी मातेची जबाबदारी आणि घराघरात स्वर्ग निर्माण करण्यासाठी माता काय करू शकतात हे उदाहरणांसह स्पष्ट केले .
चिंचवड येथील प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ. मुसळे यांनी स्त्रियांचे आजार, त्याची कारणे त्यावरील उपाय व प्रतिबंधात्मक काळजी याविषयी प्रोजेक्टर द्वारे सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात 800 महिलां भगिनीनी सहभाग घेतला .
भोसरी येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका करुणा दीदी यांनी, मातांनी आपल्या स्वतः च्या आदर्श वर्तनाद्वारे श्रेष्ठ समाज निर्मिती ची गरज स्पष्ट केली .ब्रह्माकुमार अरुण यांनी सर्वांचे स्वागत केले
ब्रह्माकुमार सूरज , विवेक व ब्रह्माकुमारी तेजस्विनी यांनी सूत्र संचालन केले .ब्रह्माकुमार संदीप यांनी कार्यक्रमाचा उद्देश व प्रस्तावना स्पष्ट केली ब्रह्माकुमार शंकर यांनी सर्वांचे आभार मानले .