पीडीसीसी सभासदांना सुनील चांदेरेंच्या हस्ते 10 % लाभांशाचे वितरण

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यक्षम उपाध्यक्ष सुनील चांदेरें यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या 10 गावचे कार्यक्षेत्र व 1700 सभासद असणाऱ्या म्हसवेश्वर वि.वि.का.से.सह.संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना 10 % लाभांशाचे त्यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
चांदेरे यांनी मुठा खो-यात वार्षिक सभेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी शेतीपूरक छोटे मोठे व्यवसाय उभे करावेत त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक तेव्हढा व कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला अशी ठोस हमी दिली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरेश नांगरे साहेब , वसुली अधिकारी राजेंद्र मारणे साहेब ,विकास अधिकारी दिनेश कंधारे साहेब , , सोसायटींचे सर्व आजी माजी संचालक मंडळ ,पंचक्रोशीतील सर्व गावचे आजी माजी सरपंच , ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरवडे आंबेगाव विकास सोसायटी व उरवडे आंबेगाव विभागीय सहकारी दूध सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली. अतिशय मोठ्या संखेने शेतकरी सभासद यावेळी जमले होते. सभेत खूप चांगली चर्चा करण्यात आली. उरवडे आंबेगाव परिसरात शेतक-यांना रिंगरोडचा मोबदला मिळताना येणा-या अडचणी मांडल्या गेल्या . यावर राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार ना भेटुन हा प्रश्न सोडविण्यात येईल असे यावेळी सुनीलभाऊंनी शेतक-यांना आपल्या भाषणात सागितलं. बॅंकेच्या सर्व योजनांची सखोल माहीती यावेळी उपाध्यक्ष चांदेरे भाऊंनी दिली.
सभेला पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री भगवानबाप्पू पासलकर , व्हाईस चेअरमन श्री भाऊ देवाडे , संचालक कालीदासभाऊ गोपाळघरे, चंद्रकांत भिंगारे सर , राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते राजाभाऊ हगवणे , मा. सभापती व राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष महादेवअण्णा कोंढरे ,तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकुशभाऊ मोरे, मा. पं. स. सदस्य सखारामबाप्पू मारणे , खारावडे देवस्थान समितीच्या अध्यक्षा सौ. मधुराताई भेलके. मुळशी शेतकरी संघाचे अध्यक्ष / पत्रकार राजेंद्र मारणे, मा. सरपंच शंकराव मारणे,माऊलीभाऊ कांबळे , मार्केट कमिटी संचालक रामभाऊ गायकवाड , भरत मारणे ,शिवसेना नेते वैभव पवळे , कैलास मारणे , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरेश नांगरे साहेब , वसुली अधिकारी राजेंद्र मारणे साहेब , विकास अधिकारी प्रशात कंधारे ,सचिव नंदुशेट मारणे, लक्ष्मण मारणे, चेअरमन रामभाऊ मारणे , चेअरमन अनिल मारणे , चेअरमन सुनील मारणे ,सोसायटींचे आजी माजी चेअरमन , व्हा. चेअरमन ,संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

See also  बारामती तुपाशी अन् मुळशी उपाशी? मुळशीकरांचे ठरले उमेदवारांना नो वोट, ओन्ली नोटा