तरणीबांड 6 मुलं ताम्हिणी घाटातील अपघातात जागीच ठार! गाडीचा चक्काचूर,   मुळशीतील बचाव पथकाने घेतला  मुलांचा शोध

महावार्ता न्यूज: पुण्यातील सहा तरुण कोकण पर्यटनासाठी जात असताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एका भीषण अपघातात यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
थार 500 फूट खोल दरीत कोसळली सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुळशीतील आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव पथकाने या मुलांचा शोध घेतला. 
पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी
अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.
सोमवारी रात्री ११.३० वाजता हे मित्र थार कार (एम.एच.१२, वायएन ८००४) घेऊन कोकणाकडे निघाले होते. मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे पालकांनी उत्तमनगर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला होता.
ड्रोनच्या मदतीने शोधकार्य
शोधमोहिमेत थार गाडी दरीत कोसळलेली आढळली. ड्रोनच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आले.
गाडीचा चक्काचूर
माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकांनी अथक प्रयत्नांनी रोप, स्ट्रेचर व क्रेनच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले. अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर
 https://www.facebook.com/share/r/1Ck46T4PDY/
वळणाचा अंदाज न आल्यामुळे अपघात
ताम्हिणी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासात, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटलं असावं, असं दिसून आलं आहे. या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहनचालनाची गरज अधोरेखित झाली आहे.
सखोल तपास
पोलीस या अपघाताचे सखोल तपास करत आहेत. मृतांची ओळख निश्चित करणे, अपघाताचे नेमके कारण शोधणे आणि इतर कोणत्याही संभाव्य प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
प्रशासनाकडून निर्देश
प्रशासनाकडून निर्देश
या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून अपघातप्रवण रस्त्यावर आवश्यक सूचना व सतर्कतेचे उपाय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
पुण्यातील ताम्हिणी घाटात थार गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली
भीषण अपघातात सहा तरुणांचा मृत्यू, पुण्यातील उत्तमनगरचे रहिवासी होते
पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने मृतदेह शोधले, सखोल तपास सुरू आहे
See also  हिंजवडीत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, सरपंच गणेश जांभुळकरांच्या विकास कामांचा झंझावात सुरू