पिरंगुट ग्राम कनेक्ट मोबाईल ॲपचे पुणे जिल्ह्यात होतंय कौतुक, आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण

महावार्ता न्यूज: औद्योगिक नगरी असलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये सक्रिय सहभाग घेत नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी सुरू केलेल्या ग्राम कनेक्ट पिरंगुट’ या मोबाईल अॅपचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
‘डिजिटल ग्राम’ संकल्पनेला मूर्त रूप देत, पिरंगुट ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या ‘ग्राम कनेक्ट पिरंगुट’ या मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण नुकतेच आमदार शंकर मांडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
‘ग्राम कनेक्ट पिरंगुट’ ॲप हे पिरंगुट ग्रामस्थांसाठी माहिती आणि सेवांचा एकच डिजिटल मंच (Single Digital Platform) म्हणून काम करणार आहे.

लोकार्पण नंतर आमदार मांडेकर म्हणाले की, “तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामस्थांना पारदर्शक आणि जलद सेवा पुरवण्याची ही चांगली सुरुवात आहे. ‘ग्राम कनेक्ट पिरंगुट’ ॲपमुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सुलभ व परिणामकारक होईल. पिरंगुटने ‘समृद्ध पंचायतराज अभियाना’ अंतर्गत इतर ग्रामपंचायतींना एक आदर्श घालून दिला आहे.”
यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक एस एस बेलदार ग्रामविकास अधिकारी प्रदीप खरमाटे माजी सरपंच, उपसरपंच, व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते..
‘ग्राम कनेक्ट पिरंगुट’ या ॲपमध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे:
नागरिक सेवा:
पाणी व्यवस्थापन (Water Management): पाणीपुरवठा आणि देयकांशी संबंधित माहिती.
कचरा व्यवस्थापन (Waste Management): कचरा संकलन वेळापत्रक व तक्रार निवारण.
दाखले व परवाने: विविध सरकारी दाखले आणि ग्रामपंचायतीचे आवश्यक दाखले (उदा. जन्म-मृत्यू नोंदी, नळ जोडणी इ.) मिळवण्यासाठी अर्ज सुविधा.
माहिती व संपर्क:
शासकीय योजना व माहिती: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अद्ययावत माहिती.
सर्व्ह व अभिप्राय: ग्रामस्थांचे मत आणि सर्वे करण्यासाठीची सुविधा.
बातम्या व सूचना: ग्रामपंचायत आणि परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व तातडीच्या सूचना.
आर्थिक उपक्रम:
शेती उत्पन्न बाजार (Agri-Market): स्थानिक शेती उत्पादनांच्या बाजारभावाची माहिती..

अॅप ची लिंक 
https://play.google.com/store/apps/details?id=com.garmconnect
See also  शंकरभाऊ आमदार झाल्याचे झळकले फ्लेक्स, भोरमधील 74 टक्के विक्रमी मते ठरविणार नवा आमदार