महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ, पदयात्रा-गावभेटीला मोठा प्रतिसाद

महावार्ता न्यूज लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक सबळाता आली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या आणखी सबळ करण्यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज मुळशी मध्ये केलं.
भोर-राजगड-मुळशी विधानसभेतील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर, माजी आमदार शरद ढमाले, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, कालिदास गोपलघरे
चंद्रकांत भिंगारे, अमित कंधारे, राजाभाऊ हगवणे राजाभाऊ वाघ, धैर्यशील ढमाले, श्रीकांत कदम, विनोद कंधारे, विजय कानगुडे, विजय यनपुरे, चंद्रकांत भिंगारे, बाळासाहेब सणस, अशोक कांबळ माऊली कांबळे, आकाश वाघ, प्रकाश वाघ, दिनेश कंधारे, सुनिल कदम, संतोष कंधारे, विजय कानगुडे, सचिन अमराळे,‌ राजेंद्र बांदल, आनंद घोगरे, लव्हु चव्हाण, दशरथ महाराज मानकर आदी उपस्थित होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, जे पंधरा वर्ष या भागाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी या भागाचा विकास नाही, साधे रस्तेही करता आलेले नाहीत. महायुती सरकारने लोककल्याणकारी योजना आणल्या. विरोधक या योजना बंद करण्यासाठी कोर्टात धाव घेत आहेत. पण, लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही. त्यासाठी तुमच्या भावाला मतदान करा, असे आवाहन ही त्यांनी केले.

रायरेश्वरचा भूखंड कोणी गिळलाय, डोंगरी परिषदेच्या आर्थिक व्यवहाराच काय झालं, राजगड कारखान्याचे काय झालं, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेच काय झाल, हे सगळं पुराव्यासहित तुमच्या पुढच्या सभेत मांडेल, असेही चाकणकर म्हणाल्या.
शंकर मांडेकर म्हणाले की, तालुक्याचे नेतृत्व करायला वाघाचं काळीज लागत. माझं नाणं खणखणीत आहे. आपण सर्वांनी मला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. आमदार गेली पाच वर्ष मतदार संघात आले नाहीत अशी टीका मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो दर मिळाला पाहिजे. मी सर्व सामान्य कार्यकर्त्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही त्यांच्यासाठी मी हजर असतो. तुम्ही संधी द्या, मी सोनं करतो.
See also  अंकुश मोरे यांच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीचे जिल्ह्यात होतयं स्वागत