


महावार्ता न्यूज : गेल्या पंधरा वर्षात मुळशीतील गाव आणि वाडीवस्तीवर केलेल्या विकास कामामुळे मुळशीतील सामान्य जनता आमच्या पाठीशी आहे. असे मत भोर विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. मुळशीतील 22 गावात आज आमदार संग्राम थोपटे यांचा झंझावात पहाण्यास मिळाला.

मुळशी तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान मुठा खोऱ्यातील विविध गावे व उरावडे, पिरंगुट, भुगाव, भूकूम येथे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी त्यांनी घेतल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. पदयात्रेलाही मोठा प्रतिसाद पहाण्यास मिळाला.
प्रचारा दरम्यान पिरंगुट येथे बोलताना थोपटे म्हणाले की,आपण आतापर्यंत कुठलाही पक्ष न बदलता कायम एकनिष्ठ राहून केलेलं राजकारण आणि समाजकारण येथील जनतेला देखील पटलेले आहे. मुळशी तालुक्यातील प्रलंबित राहिलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुळशीकर मतदारांची साथ महत्वाची आहे.याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.














