


महावार्ता न्यूज : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान आणि सुजाता महिला मंडळ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामुदायिक बुद्ध वंदना सादर केली.
या प्रसंगी बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पेरीविंकल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन राजेंद्र बांदल, माजी नगरसेवक किरण दगडे , युवा नेते सूर्यकांत भुंडे,माजी सरपंच वैशाली कांबळे, रिपाइं (आठवले) महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे संघटक उमेश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.














