मुळशीत वीज खात्याची अजब योजना, अनाधिकृत दुकानांना कागदपत्रे नसतांनाही दिले वीज कनेक्शन

पौड  ः मुळशीतील भरे मधील महाराज्य राज्य विद्युत वितरण कंपनीने सरसकट अनाधिकृत दुकानांना विज कनेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत आठ महिन्यापूर्वी तक्रार करूनही कारवाई करण्याचे काम लीगल विभागाचे असल्याचे सांगून अर्थपूर्ण उत्तर संबंधित तक्रारदाराला दिल्याचा अजब प्रकार घडला आहे. 
एकीकडे अधिकृत वीन कनेक्शनची थकबाकी काही लाखात असताना दुसरीकडे अनाधिकृत दुकान बांधा आणि खोटीे कागदपत्रे जोडून वीज कनेक्शन घ्या, मात्र बील वेळेत भरा या अटीवर मुळशीत अनेक दुकानदारांना अनाधिकृत कनेक्शन दिल्याचे समोर आले आहे. पिरंगुट ओढ्याजवळील नव्या पूलाचे काम चालू आहे तेथील 10 दुकांनाना अनाधिकृत कनेक्शन दिल्याची तक्रार 8 महिन्यापूर्वी भरे येथील वीज मंडळाच्या कार्यलयात देण्यात आली होती. मुख्य अभियंता श्री घुले यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सहाय्यक अभियंता श्री चव्हाण यांना दिले. श्री चव्हाण यांनी 4 महिने अर्ज धुळ खात पडून ठेवला. याबाबत घुले यांना कळविताच त्यांनी चव्हाण यांना नोटिस काढण्यास सांगितले. श्री. चव्हाण यांनी नोटिस काढण्यासाठी 2 महिने घेतले. दरम्यानच्या काळात अर्थपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. 
अखेर आठ महिन्यांनी श्री. चव्हाण यांनी आपला अर्ज हा आमच्या लीगल विभागला दिला आहे, तेच याबाबत पुढील कार्यवाही करतील असे उत्तर तब्बल 8 महिन्यांनी दिले. हे अर्थपूर्ण उत्तर ऐकून तक्रारदार चक्रावला असल्याचे दिसून आले.
3 वर्षापूर्वी अशीच अनाधिकृत वीज कनेक्शन बाबतची तक्रार तत्कालीन मुख्य अभियंता श्री. फड यांच्याकडे तोडी देण्यात आली होती. फड यांनी भुकूममधील ते अनाधिकृत वीज कनेक्शन काही तासातच कट केले होते. मीटर जप्त केलर होता. तसाच प्रकार पिरंगुटमध्ये घडूनही सदरची मिळकत ही अनाधिकृत असल्याचे पुरावे देऊनही वीज मंडळाचे तातडीने कारवाई का केली नाही याबाबत अर्थपूर्ण सांशकता आहे. 
अनाधिकृत कनेक्शन असल्याचे प्रथमदर्शन दिसून येताच े कनेक्शन तोडून मीटर जप्तीबाबतचा वीज मंडळाचा नियम असताना पिरंगुटमध्ये अजब अभय योजना का सुरू आहे. अनाधिकृत वीज कनेक्शनच्या या मुळशी पॅटर्नची तक्रारीचे निवारण झाले नाही तर आता थेट मुख्यमंत्र्यांनाच तक्राराचा अर्ज पाठविण्यात येणार आहे. संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करावी असे मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेल्या तक्रार अर्जात लिहिले गेले आहे. 
See also  ग्रंथतुलाने माजी खासदार अशोक मोहोळांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा, अमृत महोत्सवनिमित्त मीरा मोहोळांचा गौरव , शीला मोहोळांचा विशेष सत्कार