मुळशीतील पीएमआरडीएच्या रस्ते व सुविधा भूखंडाचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण, सुस, म्हाळुंगे, बावधन गावांना होणार लाभ

महावार्ता न्यूज: पुणे महानगर प्रदेश विकास प्रा‍धिकरणाकडुन, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या 34 गावांमधील, प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले सुविधा भूखंड (ॲनेमिटी स्पेसेस) आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र (रोड वाईडनिंग) पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात देणेची कार्यवाही सुरु करणेत आली आहे.
​त्या अनुषंगाने, प्राधिकरणाचे जमिन व मालमत्ता विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभाग यांनी प्राधिकरणाचे उप अभियंता श्री. वसंत नाईक, व पुणे महानगरपालिकेचे उप अभियंता यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पथक तयार करुन, मौजे सुस, ता. मुळशी, जि.पुणे येथील 05 प्रकरणांतील सुविधा क्षेत्र व रस्ता रुंदीकरणासाठीचे क्षेत्र संयुक्त स्थळपाहणी करुन प्राधान्याने हस्तांतरीत केले आहे. त्यामध्ये सुविधा क्षेत्र 688 चौ.मी. आणि रस्त्याखालील क्षेत्र 6388 चौ.मी. असे आणि महाळुंगे ता. मुळशी, जि. पुणे येथील 3 प्रकरणातील रस्त्याखालील क्षेत्र 10,957 चौ.मी. असे मौजे-बावधन बु., ता.मुळशी, जि.पुणे येथील 1 प्रकरणातील सुविधा क्षेत्र 1852 चौ.मी. व रस्ता रुंदीकरणासाठीचे क्षेत्र 314 चौ.मी. असे एकूण सुविधा क्षेत्र 2540 चौ.मी. व रस्त्याखालील क्षेत्र 17650 चौ.मी असे रस्ता क्षेत्र व सुविधा क्षेत्र एकुण 20200 चौ.मी. म्हणजेच 2 हे. 02 आर क्षेत्र दि.22/12/2023 अखेर प्राधिकरणाकडुन महानगरपालिकेकडे ताब्यात देणेत आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रावर विकसनासाठी पुणे महानगरपालिकेला सोयीसुविधांचा विकास करणेसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. 
See also  पेरिविंकलची कौतुकास्पद वाटचाल विद्यापीठ होण्याच्या दिशेने, 10 व 12वी निरोप समारंभात तापकीर यांचे मनोगत