पेरिविंकलचे स्नेहसंमेलन जल्लोषात , मुळशीकरांकडून कौतुकाची थाप 

महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन बाणेर येथील बंटारा भवन येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले.

“बंधन” म्हणजेच अ बॉण्ड ऑफ रिलेशन..या थीम वर आधारित शाळेच्या मुख्याध्यापिका सौं निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
बंधन म्हणजेच ऋणानुबंध मग ते मानवतले असो रक्ताच्या नात्यांचे असो किंवा एखाद्या वस्तुशी असो वा निसर्गाचे असोत बंधन हा एक असा धागा आहे की जोडलेला असला तर कोणीही हे बंध सोडू शकत नाही असा खूप मोलाचा संदेश सूस शाखेच्या चिमुकल्यानी त्यांच्या प्रत्येक पर्फोर्मँसेस मधून दिला. सबसे प्यारे हैं दादा , तेरे मेरे बीच मे कैसा हैं बंधन, तारक मेहता, आशियाना, एकटी एकटी घाबरलीस ना आदी एक से बढ़कर एक गाण्यांवर अत्यंत बहारदार पर्फोर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दिपवणारे आविष्कार सादर केले.
अगदी सुरुवातीला राष्ट्रगीताने नाट्यगृहाचा पडदा उघडून कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी माजी आमदार शरद भाऊ ढमाले, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किशोर भाऊ शिंदे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी बेरड साहेब, भारतीय जनता पार्टीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते धनंजय दगडे व मंदार घुले, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा नेते सूर्यकांत भुंडे, अभिजीत दगडे, उद्योजक बाळासाहेब खाटेर, संदीप शेठ ढमढेरे, युवराज मते, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गायकवाड, उद्योजक जयंतभाई कनेरीया, डॉक्टर सुधीर कुमार ठिगळे सर, संस्कार प्रयमरी सकूल च्या सौ स्नेहा साठे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल ,शाळेचे तडफदार संचालक यशराज बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यगृहाच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्याना “स्टूडेंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मुकुट , सर्टिफिकेट व ट्रॉफी प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले .
यावेळी शाळेतर्फे मान्यवरांना देखील पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी बहाल करण्यात आली तसेच श्रीरामाच्या मूर्तीचे मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी शाळेचा चढता आलेख त्यांच्या वार्षिक अहवालात सादर करून वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , शिक्षकांचे ,मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले व दिवसेंदिवस हा आलेख असाच वाढून आता यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे नमूद केले.
तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी पालकांचे शाळेशी असलेले बंधन यातच सर्व काही आले असे सांगून सूस शाखेच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मुख्याध्यापिका , शिक्षक व सर्वांचे मनापासून कौतुक करून आज येथे असणारा प्रत्येक विद्यार्थी मोठाच होणार व या व्यासपीठावर आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाखेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.

See also  पेरिविंकलमध्ये ख्रिसमस संध्यानिमित्त मुलांची धमाल, शेकोटीचा कार्यक्रम करणारी ठरली मुळशीतील पहिलीच शाळा

तसेच खरच लहान लावलेल्या पेरिविंकल च्या रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो व सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले असे प्रतिपादन मा.आमदार शरदभाऊ ढमाले यांनी केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी ,सचिन खोडके, शिवप्रसाद पुजारी सर व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. प्रफुल्ला पाटील व इयत्ता 6वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करण्यात आली.