ऑलिम्पिक दिन समारंभ २०२५
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत रंगणार समांरभ
पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त सोमवारी सोमवार २३ जून रोजी पुण्यात ऑलिम्पिक दौड, प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन, खेळाडूंचा गौरवासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील ऑलिम्पिक दिन मुख्य समारंभ स.प. महाविद्यालयात सकाळी १० वाजता रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पियन, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी क्रीडामंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना (एमओए) महासचिव नामदेव शिंरगांवकर यांनी दिली आहे.
समारंभाचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता ऑलिम्पिक दौडीने होईल. ऐतिहासिक लाल महाल येथील बाल शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौडीची सुरुवात होईल. मर्दानी खेळ व विविध खेळांची प्रात्याक्षिके ही लाल महालातही होणार आहे. आंतररष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून ऑलिम्पिक दौडीचा प्रारंभ होईल. २३ जून रोजी जगभर ऑलिम्पिक दौडीचे आयोजन केले जात असते. पुण्यात २ दशकांपासून ऑलिम्पिक दौडची परंपरा सुरू आहे.
ऑलिम्पिक दौडमध्ये ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहे. शिवाजी रोडने दगडूशेठ गणपती समोरून लक्ष्मी रोडने अलका टॉकीज चौक , टिळक रोडने स.प. महाविद्यालयात दौडची सांगता होईल. ढोल ताशांच्या गजरात ऑलिम्पिक दौडचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर स.प.महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल.
स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये मुख्य समारंभात आजी-माजी ऑलिम्पिक विजेते, ऑलिम्पियन,, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. गणेश वंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक हे समारंभाचे वैशिष्ट असणार आहे.