मुळशीतील ब्रम्हाकुमारी केंद्रात 2 हजार भक्तांचा साक्षीने रंगला आध्यात्मिक दिवाळी मेळावा

महावार्ता न्यूज: मुळशीतील दारवलीमधील ब्रह्माकुमारी केंद्रात दिवाळी मेळाव्यात 2 हजारपेक्षा अधिक भक्तांनी आध्यात्मिक आनंद लुटला.
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या भोसरी येथील मुख्यसेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय करुणा दीदींच्या संकल्पनेने हा मेळा साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड व पुणे येथील परिसरातून भाविक सहभागी झाले होते.  16 स्टाॅलमधून ईश्वराच्या आठवणीत राहून बनवलेले सात्विक शाकाहारी दिवाळी फराळासह इतर पदार्थांचा सर्व आस्वाद घेत होते. सात्विक आहाराचे आरोग्यासाठी महत्त्व स्पष्ट होईल असे सर्व स्टॉल असे सजविण्यात आले होते दिवाळीचे आध्यात्मिक रहस्य यावर मिरा सोसायटी सब झोन इन्चार्ज आदरणीय सुनंदा दीदीजी, नलिनी दीदीजी व महाराष्ट्र प्रवक्ता दशरथ भाईजी यांनी प्रवचन केले.

नैतिक मूल्यांवर आधारित खेळ – सापशिडी , रिंग बॉल , दैवी गुण – अवगुण ,लक्ष-भेद जिंकणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक भेट वस्तू देण्यात आल्या.
आत्म जागृती व परमात्म अनुभूती चे ध्यान करून घेण्यात आले. भगिनींनी व मुला – मुलींनी आध्यात्मिक थीम वर आधारित गीत संगीत व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी वरिष्ठ राजयोग शिक्षिका बीके उषा ( मिरा सोसायटी पुणे ) बीके संगीता(नारायणगाव),  बिके अर्चना ( शिरूर ), बीके स्वाती ( नांदेड), बीके सुनीता ( कोथरूड ), बीके अश्विनी ( चिंचवड ) तसेच इतर राजयोग शिक्षिका उपस्थित होत्या.

जवळपास दोन हजार व्यक्तींनी या अनोख्या दिव्य आध्यात्मिक दिवाळीचा आनंद लुटला व त्याच बरोबर आपल्या जीवनात नैतिक मूल्य धारण करण्याची प्रेरणा घेवून गेले.
संदीप भाईजी व शंकर भाईजी यांनी सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. तेजस्विनी दीदी व सूरज भाईंनी सूत्र संचालन केले आणि ज्योती दीदींनी आभार मानले .
See also  पौड पोलीसांकडून शासकीय कार्यालयासह एसटी स्टँड परिसर चकाचक , गुन्हेगारांची सफाई करणार्‍या हातात दिसला झाडू