लक्ष्मी सरडे यांचे निधन, दिपक सरडे यांना मातृशोक

महावार्ता न्यूज: गोळेआळी पिरंगुटमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नंदकुमार सरडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या.
मुळशीत सामाजिक व धार्मिक कार्यक्रम हिरीरीने सहभाग घेणाऱ्या लक्ष्मी नंदकुमार सरडे यांच्यामागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक दीपक सरडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
पती नंदकुमार सरडे यांचे 35 व्या वर्षी निधन झाल्यानंतर लक्ष्मी सरडे यांनी मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा चालविला. आपल्या मुला मुलींना सुशिक्षित करण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीचे आजही पंचक्रोशीत कौतुक केले जाते.
गुरुवार 25 एप्रिल रोजी पिरंगुटमधील प्रयागधाम स्मशान भूमीत लक्ष्मी नंदकुमार सरडे यांचा दशक्रिया विधी सकाळी 8 वाजता होणार आहे.
See also  हिंजवडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा जय गणेशचा नारा, दुसर्‍यांदा सरपंचपदी गणेश जांभूळकरांची वर्णी