हिंजवडीतून बगाडासाठी शेले आणण्यासाठी हजारों भाविकांचे प्रस्थान, चांगभलंच्या जयघोषाने दुमदुमली आयटीनगरी

महावार्ता न्यूज   वाकड-हिंजवडी गावचे ग्राम दैवत श्री म्हातोबा देवाच्या बगाड मिरवणुकीसाठीच्या बगाडाचे शेला (लाकूड) आणण्यासाठी  हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो शेलेकरी मुळशीतील  बारपेच्या (आडगाव) दिशेने रवाना झाले. हिंजवडीतील म्हातोबा टेकडी पायथ्याशी असलेल्या शिवाजी चौकातून बारपेच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी महिलांनी औक्षण करून व साखर, पेढे भरवून शेलेकऱ्यांना निरोप दिला. यावेळी पैस… पैस.. म्हातोबाच्या नावं चांगभलं, चांगभलं बोला चांगभलंच्या जय घोषाने अवघी आयटी नगरी दुमदुमली.

सायंकाळी गावठाणातील म्हातोबा मंदिरात शेलेकरी व ग्रामस्थानी देवाचे दर्शन घेतल्यानंतर शेलेकऱ्यांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ व भाविकांनी शिवाजी चौक अभूतपूर्व गर्दी केली होती. उत्सव प्रमुख किसन साखरे पाटील यांनी प्रवासात घ्यावयाची काळजी याबाबत शेलेकऱ्यांना सूचना केल्या. वसंत जांभुळकर यांच्याकडे खाक सुपूर्त केली. 
 

हनुमान जयंतीच्या (चैत्र पौर्णिमा) म्हणजेच यात्रेच्या १० दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या १० दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही बगाडाला नैवद्य-बोण दाखवूनच उपवास सोडला जातो. हनुमान जयंतीला दुपारी ४नंतर हिंजवडी गावाठानातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते, मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड हिंजवडीत जमतात.
शेळेकऱ्यांचा पहिला मुक्काम जमगाव दिसली येथे करून दुसरा मुक्काम आडगाव बारपे येथे करून दुसऱ्या दिवशी पहाटे लाकडाची शेले म्हणून निवड करण्यात येते महाप्रसाद घेऊन हे शेले खांद्यावर घेऊन शेलेकरी हिंजवडीच्या दिशेने मार्गस्थ होतात रस्त्यात पुन्हा दिसली येथे मुक्काम करून हनुमान जयंतीच्या दोन दिवस आधी म्हणजेच रविवारी रात्री (ता. २१) तारखेला शेलेकरी हिंजवडीत दाखल होणार आहे

प्रस्थान झालेल्या शेलेकऱ्यांचा पहिला मुक्काम मुळशी तालुक्यातील आसदेत व दुसरा मुक्काम आडगाव बारपे येथे असतो. शनिवारी पहाटे शेल्याची निवड करण्यात येणार असून सकाळी महाप्रसाद घेऊन हे शेले खांद्यावर घेऊन शेलेकरी हिंजवडीच्या दिशेने पुन्हा पायी मार्गस्थ होणार आहेत.
रस्त्यात पुन्हा आसदेत मुक्काम करून हनुमान जयंतीच्या दोन दिवस आधी शेलेकरी हिंजवडीत दाखल होतील. त्यानंतर आणलेले लाकूड बगाड रथावर लावून बगाड मिरवणुकीत या लाकडावर गळकऱ्याला बसवून गोलाकार फिरवले जाते . हा अविस्मरणीय सोहळा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो
See also  रामजन्मभूमीतील सर्वप्रथम किर्तनाचे मानकरी पंकज महाराजांचा राजेंद्र बांदल परिवाराकडून गौरव