


महावार्ता न्यूज ः महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांना मुळशीतील आय टी पार्क परिसरातील गावांमध्ये प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला. चांदे, माण, मारूंजी, हिंजवडी, नेरे, कासारसाई, जांबे, ताथवडे, सूस, म्हाळुंगे गावात प्रचारात मोठी गर्दी उसळली होती.
हॅटट्रिक आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशीतील प्रचाराच्या पाच फेर्यात संपूर्ण मुळशी तालुक्यात गावभेटीचा दौरा पूर्ण केला आहे. या प्रचाराच्या पाचव्या फेरीत जागतिक नकाशावर असलेल्या राजीव गांधी आय टी पार्कच्या गावांचा समावेश होता. काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्या नव्या कासारसाई- हिंजवडी जिल्हा परिषद गटात आमदार थोपटेंचे जंगी स्वागत करण्यात आले.

रिहे खोरे, घोटावडे नंतर आमदार थोपटे यांनी माण, हिंजवडी, मारूंजी, नेरे, जांबे, ताथवडे व सूस गावात गावभेट दौरा केला. विजयी आमदार असल्यासारखा पाठिंबा या गावातून दिसून आला. सर्वच गावात थोपटेंसह त्यांच्या कार्यकत्यार्ंंचे भव्य स्वागत करण्यात आले. हिंजवडीत बैलगाडीतून केेलेला प्रचार लक्षवेधी ठरली. हिंजवडीतील विविध विकास कामांचे फलक हाती घेत ग्रामस्थांनी थोपटे यांचे अनोखे स्वागतही केले. माजी खासदार नाना नवले यांना मानणारे मोठा वर्ग या भागात आजही असल्याची प्रचिती दौर्यात कार्यकर्त्यांना आली. नाना नवले यांनीही ताथवडे गावात उमेदवार थोपटे यांना शुभेच्छा देत आपला गड कायम राहील अशी ग्वाही दिली. मारूंजीत 50 फूट भव्य हार परिधान करून काँग्रेस उमेदवार संग्राम थोपटे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जीपमधून काढलेल्या माण- हिंजवडी फेरीला स्थानिक नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला.















