ब्रह्माकुमारीज पिरंगुट शाखेद्वारे तणावमुक्त जीवनवर मार्गदर्शन

महावार्ता न्यूज: ब्रह्माकुमारीज़च्या व्यापार, उद्योग प्रभाग अंतर्गत कोल्हापुर ते पुणे विशेष अभियान आयोजित करण्यात आले. या अभियाना अंतर्गत ब्रह्माकुमारीज पिरंगुट शाखेद्वारे “मानसिक स्वास्थ सम्पन्न व तनावमुक्त जीवन” या विषयावर विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात पिरंगुटमधील व्यापारी बांधव, ब्रिटन कार्पेट एशिया प्रायव्हेट लिमिटेड, कोकाकोला ंवाँस एक्झोटेक प्रायव्हेट लिमिटेड, भारती विद्यापीठ लवळे, बिन्नी इंडस्ट्रीज यांनी सहभाग घेतला.

हैदराबाद येथून आलेल्या मुख्य वक्त्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी राधिका दीदीनी तणावमुक्त जीवन आणि व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी प्रवीणा दीदी व ब्रह्माकुमारी पुनम दीदी यांनी विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचा परिचय व प्रस्तावना ब्रह्माकुमारी अश्विनी दीदी यांनी केले. ब्रह्माकुमारी मंजू दीदी यानी ब्रह्माकुमारीज संस्थेचा परिचय दिला आणि राकेश भाई यांनी अभियानाचा उद्देश सांगितला.
यामध्ये कार्यक्रम मध्ये प्रामुख्याने तणाव म्हणजे काय तणाव विरहित जीवन जगण्यासाठी कंपनी, व्यवसाय अथवा गृहस्थ जीवन मध्ये नेहमी सकारात्मक कसे राहायचे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन करुणा दीदी यांची प्रेरणा होती.
करंजकर ,पारखी , चौधरी , बिन्नी , R.N. पाटील सर, प्रवीण , मेघना मॅडम आणि सोनाली मॅडम यांचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने व्यापर व उद्योग प्रभागा अंतर्गत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला त्याबद्दल ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी विद्यालयामार्फत सर्वांचे व इश्वराचे आभार मानले आहे
See also  पेरिविंकलच्या  विद्यार्थ्यांनी घेतले योग साधनेचे धडे, सर्वच शाळा झाल्या योगमय, अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनीही केली योगासने