पेरिविंकलमध्ये ख्रिसमस संध्यानिमित्त मुलांची धमाल, शेकोटीचा कार्यक्रम करणारी ठरली मुळशीतील पहिलीच शाळा

महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेत ख्रिसमस संध्या शेकोटीने साजरी करण्यात आली. शेकोटीची उब विद्यार्थ्यांना देणारी पेरिविंकल स्कूल ही मुळशीतील पहिलीच शाळा ठरली आहे.
ख्रिसमस ईव्ह च्या निमित्ताने वाढत्या थंडीचे व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून विदयार्थी व शिक्षकांसाठी बॉनफायर म्हणजेच शेकोटीचे आयोजन केले होते. परीक्षा संपून नाताळच्या सुट्ट्या लागण्याआधी विदयार्थ्यांनी या वर्षभरात केलेल्या परिश्रमाची व मेहनतीची दाद म्हणून त्यांना शेकोटीच्या बाजूला गेम्स, गाणी, अंताक्षरी असे नानाप्रकारचे खेळ घेऊन या वर्षाला गुड बाय करून नवीन वर्षाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांची पालकांसमवेत शाळेत संध्याकाळी खास शेकोटी रंगली होती.

सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा करणे व येणाऱ्या थंडीची तमा न बाळगता सर्व वाईट आठवणी, विचार, रोगराई या शेकोटी बरोबर निघून जाऊन नवीन चैतन्य, उत्साह व जोमाने नवीन वर्ष असावे हे या शेकोटीचे उद्दिष्ट होते.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौं रेखा बांदल व यश बांदल यांनी या शेकोटीच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शविली. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा यात सक्रिय सहभाग होता.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित, पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सचिन खोडके, सन्मती चौगुले व ज्योती यांच्या सह सर्व शिक्षकवृन्द व शिक्षकेतर कर्मचारी केले, कार्यक्रमाचे संयोजन ज्योती भादोरिया यांनी पाहिले.
See also  पिरंगुटमध्ये सातव्या मजल्यावरून पडल्याने पेपर विक्रेतेचा मृत्यू, मदतीसाठी मुळशीकर सरसावले