ब्रह्माकुमारीज पिरंगुट सेवाकेंद्रचा १७वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महावार्ता न्यूज: हृदय मोहिनी वन (दारवली) या येथे ब्रह्माकुमारीज परिवारातर्फे पिरंगुट सेवाकेंद्र चा १७वा वर्धापन दिन तसेच व  ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. याप्रसंगी भोसरी सेवाकेंद्राच्या प्रमुख व मार्गदर्शक आदरणीय करुणा दीदी जी या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी ‘तणाव मुक्त जीवन’ याविषयी  बहुमोल असे मार्गदर्शन केले. आज आपल्या देशाला खरी स्वतंत्रता तर मिळाली परंतु निराशा, भय, भ्रष्टाचार या पासून स्वतंत्रता कशी मिळेल याचे मार्गदर्शन दिदींनी केले. अधिक माहिती साठी नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवेकेंद्राला अवश्य भेट द्या असे आवाहन दिदींनी केले.

चिंचवड सेंटरच्या संचालिका अश्विनी दीदी जी यांनी पिरंगुट सेवाकेंद्राच्या स्थापनेचा  इतिहास सांगितला. स्वतंत्रता दिवसाचे औचित्य म्हणून याप्रसंगी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला व ध्वज प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुष मंत्रालयाचे सल्लागार सदस्य संपत मेंगडे, अभिनव फार्मर क्लबचे डायरेक्टर व कृषी तज्ञ ज्ञानेश्वर बोडके, उद्योजक प्रफुल्ल पाटील, डॉक्टर गणेश जाधव, कर्नल गणेश झापे इ. मान्यवर व ब्रह्मकुमारीस परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके आकांक्षा दिदी यांनी केले तर आभारप्रदर्शन पिरंगुट सेवाकेंद्राच्या संचालिका बीके ज्योती दीदी यांनी केले.
See also  भुकूममध्ये आज सीतामाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, नामस्मरण