ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेसह ऑलिम्पिक पत्रकार संजय दुधाणेंचा बुधवारी पेरिविंकलमध्ये गौरव

बावधन ः तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणार्‍या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे यांचा पेरिविंकल स्कूलच्या वतीने मुळशी तालुका व समस्त बावधन ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार 28 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. याप्रसंगी पॅरीस ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणारे आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांचाही सन्मान केला जाणार आहे.


चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल स्कूल बावधन शाळेत राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेसह ऑलिम्पिक पत्रकार संजय दुधाणे यांचा गौरव मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या हस्ते होईल. पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, व संचालिका रेखा बांदल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर थ्री पोझीशन नेमबाजीत कांस्यपदकाचा पराक्रम करणार्‍या स्वप्नील कुसाळेचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्क्म बक्षिस देऊन गौरव केला जाणार आहे. गेल्या दहा वर्षातील सर्व महाराष्ट्र केसरीचा गौरव करणारी व ऑलिम्पिक विजेत्यांचा सन्मान करणारी पेरिविंकल स्कूल ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा ठरली आहे.

See also  युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड, पुण्यात काॅग्रेसचे ताकद दिसणार- अमराळे