हिंजवडी तुळजाभवानी मंदिरात आयटीयन्स भविकांची मोठी गर्दी, वाघेरे कुटुंबियाची 22व्या वर्षी मनोभावे देवीसेवा

महावार्ता न्यूज ः हिंजवडीतील तुळजाभवानी मंदिरात भक्तीमय उत्साहात नवारात्र उत्सव साजरा होत असून परिसरातील आय टी कंपनीच्या अभियंतेची मोठी गर्दी होत आहे. 22 वर्षांपासून शेतकरी कुटुंबातील पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी भव्य मंदिर उभे करून त्यांचे कुटुंब देवीचा मनोभावे सेवा करीत आहेत. 
2001 पासून अनेक आय.टी. अभियंते मंदिरात नियमीत येत असून नवरात्रीच्या काळात संध्याकाळी या मंदिराच्या परिसरात भक्तीमय वातावरणाचा अनुभव येत आहे. अनेक संगणकतंज्ञ नाराळाचे तोरणेही अर्पण करतना दिसत असून  आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराची शोभाही लक्ष वेधून घेत आहे. 

नवव्या माळेला परिसरातील पत्रकारांच्या हस्ते आरती करण्यात आली. महावार्ताचे संपादक संजय दुधाणे, मुळशी पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष रमेश ससार, सकाळचे पत्रकार बेलाजी पात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी पांडुरंग वाघेरे, हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य मयूर साखरे, विनायक वाघेरे, रोहन वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

22 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या आयटी नगरी हिंजवडीतील प्रति तुळजापूर असे संबोधल्या जाणार्‍या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला देखील महाराष्ट्राच्या कांना कोपर्‍यातून भाविक येऊन नवस फेडतात.         हिंजवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह खर्‍या अर्थाने हिंजवडीतील उच्चभ्रू आयटीयन्स कुटुंबीयांची इच्छापूर्ती करणारी देवी अशी ख्याती देवीची आहेत्
देवीचे भक्त पांडुरंग वाघेरे यांच्या पत्नी कविता वाघेरे यांच्या अंगात देवीचे वारे आले अन गुरूंनी त्यांना मंदिर उभारण्याची आज्ञा केल्याने निस्सीम भक्तीतून वाघेरे यांनी हे भव्यदिव्य मंदिर उभारले.  हे मंदीर श्री क्षेत्र तुळजापूराचे प्रतिरूप आहे. गाभार्‍यात सव्वा तीन फुटांची काळ्या पाषाणातील मोहक मूर्ती आहे. समोर शिवलिंग आहे मंदिरासमोर मोठी डिकमाळ आहे. तर मागे चिंतामणी आहे तो त्याने दिलेला कौल कधीही चुकीचा ठरत नाही अशी श्रद्धा असल्याने भाविक दर्शनानंतर कौल लावण्यासाठी गर्दी करतात. भक्तांच्या सुविधेसाठी संपूर्ण वाघेरे कुटुंब कायम राबत असते.
महाराष्ट्राचे नव्हे देशाचे भूषण असलेल्या हिंजवडीत म्हातोबा देवस्थान, शिवाजी चौकातील सुवर्ण गणेश मंदिर आणि तुळजाभवानीचे मंदिर ही आय.टीतील मंडळींची भक्तीतिर्थ बनली आहेत.  हिंजवडी-वाकड मार्गावर आय.टी. पार्कच्या मुख्यरस्त्यावरच पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी  स्वखर्चाने 2002 मध्ये तुळजाभवानीचे प्रेरक मंदिर साकारले आहे. मंदिरात सुबक अशी मनमोहक तुळजाभवानीची मूर्ती असून देवीची साडीचोळीने पूजाअर्चा करण्यात येत आहे.  होमहवन, आरती, अन्नदान हे कार्यक्रमाहीनवरात्र उत्सवात सालाबादप्रमाणे करीत असल्याने  वाघिरे परिवार पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. 
See also  पेरिविंकलच्या सुस शाखेतील 10, 12वी  विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभ उत्साहात संपन्न