


दत्ता आफळे
जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा ते सहसा स्टेडियमपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासाने सुरुवात करतात पण माझ्यासाठी, ही जी की सगळ्यांसमोर आलीये ती माहिती ही नाहीये. माझी सुरुवात नेहमीच भल्या पहाटे बसने सुरू व्हायची. मी अकरा वर्षांचा होतो त्यावेळी माझी किट बॅगसुद्धा माझ्या वजनापेक्षा जड असायची ती बॅग घेऊन मी सूर्योदयापूर्वी माझे विझिंजममधले घर सोडायचो, दोन बसेस बदलत सकाळी ६ वाजता मेडिकल कॉलेजच्या मैदानावर मी पोहोचायचो. काही काही वेळा मला झोप येत असायची तर काही दिवस सततच्या सरावाने अंग दुखत असे, कधी कंटाळा येत असे. पण मला आठवत नाही की कधी या कारणांमुळे मी माझा सराव चुकवलाय. किंबहुना तो सराव चुकवायचा विचारही माझ्या मनात कधी म्हणजे कधीच आला नाही.















