मुळशीच्या आयुषा इंगवलेला राष्ट्रीय स्पर्धेत रूपेरी कामगिरी

महावार्ता न्यूज ः ः मुळशीतील भुगावमधील राष्ट्रीय खेळाडू आयुषा प्रमोद इंगवलेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करीत राष्ट्रीय ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत रूपेरी पदकाचा चकमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. 
आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे झालेल्या ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत आयुषाने दुहेरीत रितिका मोरे सोबत खेळताना रौप्य  पदकाची कमाई केली.  स्पर्धेत 20 राज्यातील 329 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 
आंध्रप्रदेश संघाला 3-1, तेलंगण, छत्तीसगड संघाला 3-0 सेटने पराभूत करून आयुषाने महाराष्ट्राकडून खेळताना अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत जम्मू-काश्मिरकडून महाराष्ट्राचा पराभव झाल्याने रौप्यपदक मिळाले. 
आयुषा प्रमोद इंगवले एस. पी कॉलेजमध्ये 12 वीत शिकत असून विल्सन अ‍ॅड्रीव यांचे मिला मार्गदर्शन मिळत आहे. राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सलग पाचव्यांदा पदक जिंकण्याचा पराक्रम करणारी आयुषा ही महाराष्ट्रातील एकमेव महिला आहे. तीने आतापर्यंत 28 राष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे. 
See also  मामासाहेब मोहोळ स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीचे गदेचे पुण्यात पूजन, 1983 पासून मोहोळ कुटुंबियांकडून देण्यात येते मानाची गदा