


शिवछत्रपतींचे नाव जोडले गेले हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण
पुणे ः महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्काराने मुळशी तालुक्यातील हिंजवडीमधील गणेश सोमनाथ नवले याला सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, यांच्या हस्ते गणेश सोमनाथ नवलेला प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.















