महावार्ता न्यूज: मुळशीतील ९२ ग्रामपंचायतींचे पुढील ५ वर्षांसाठी (सन 2025 ते 2030 या सालासाठी)सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाल्या.
मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. तहसीलदार रणजीत भोसले यांनी शालेय मुलांनी चिट्टी काढल्यानंतर सोडत जाहीर केली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, सहाय्यक महसूल अधिकारी, अजय सावंत, गटविकास अधिकारी भागवत, मंगेश शिंगटे, मुकुंद डिंबले उपस्थित होते. अभिजीत बलकवडे,सतीश साळुंके, ज्ञानेश्वर पोळ यांनी प्रोजेक्टर व्दारे हे आरक्षण प्रदर्शित केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी हजर होते.