मुळशी धरणग्रस्तांची 5 डिसेंबरपासून निषेध दिंडी,.माले ते मुंबई मंत्रालया पर्यंत ही दिंडी धडकणार

पौड – मुळशी धरणग्रस्त व मुळशी तालुक्यातील जनतेच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निषेध 5 डिसेंबरपासून निषेध दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी सेनापती बापट स्मारक ते मुंबई मंत्रालया पर्यंत ही दिंडी धडकणार आहे. 

ही दिंडी केवळ काही व्यक्तींची नसून, मुळशीच्या जनतेच्या हक्कांची, अस्मितेची आणि न्यायाची लढाई आहे. आपल्या मागण्यांना आवाज देण्यासाठी, आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे धरणग्रस्तांचे नेते अमित कंधारे यांनी सांगितले आहे.
मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व बांधवांनी या निषेध दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.आपली एकजूट हीच आपली ताकद आहे. शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांचा आवाज बुलंद करूया.असे आवाहनही कंधारे यांनी केले आहे.
See also  पेरीविंकलचा कलाविष्काराने गाजले स्नेहसम्मेलन,बालगोपालांच्या सूत्रसंचालनाने जिंकली मने