मुळशीतील महायुतीच्या बूथ कमिटी बैठकीला मोठा प्रतिसाद , ही  काँग्रेस नसून संग्राम काँग्रेस –  शंकर मांडेकर

 महावार्ता न्यूज : भोर विधानसभा मतदार संघात काँग्रेस हा पक्ष राहिलेला नसून तो संग्राम काँग्रेस पक्ष झाला आहे, अशी टीका महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आज पिरंगुट मध्ये केली.भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक पिरंगुट येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे आमदार डॉ.वाय ए नारायण स्वामी, आमदार शरदराव ढमाले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा नंदू शेठ भोईर, मुळशी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकुश मोरे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, ज्येष्ठ नेते किसान नांगरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजगड किरण राऊत, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाबा कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन अमराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुका अध्यक्ष अनुप मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की, विद्यमान आमदारांनी केलेल्या क्रीडा संकुलनाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. पुन्हा जर त्यांना निवडून दिले तर ते मतदार संघात येणार नाहीत, “जे कार्यकर्ते विद्यमान आमदारांसाठी निवडणुकीमध्ये कष्ट घेतात, त्यांच्याकडे नंतर लक्षही देत नाहीत, आमदार नगरपालिका जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तुमच्या प्रचारासाठी सुद्धा येणार नाहीत याची मला खात्री आहे”
तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठींबा दिल्याचे सांगत मांडेकर म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीत विजयाचा इतिहास घडवूया त्यासाठी बूथ कमिट्या बळकट करा असे आव्हान त्यांनी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना केले.
मुळशीतील तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे गावांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळी आहेत. स्थानिक तरुणांना तालुका व त्यांचे गाव सोडून इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जावे लागते. याला सर्वस्वी आमदार जबाबदार आहेत. तरुणांना रोजगार व मतदार संघातील इतर प्रश्न लवकरात लवकर सोडून ते मार्गी लावण्याचे काम मी करेन अशी ग्वाही मांडेकर यांनी यादरम्यान दिली.”
See also  पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्यावतीने  शिवजयंती साजरी, मोहनराव दुधाणेंकडून शिवभक्तांना शुभेच्छा