


मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमताने निवड चौथ्यांदा अध्यक्षपदी तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीची निवड २३ नोव्हेंबला होणार असल्याचे सर्वाधिकार असलेल्या अजीत पवार यांनी जाहिर केले. २० कार्यकारिणी आणि ८ नियुक्त पदाधिकारी अशी २८ संघटकांची निवड केली जाणार आहे.
मुंबईत संध्यकाळी संपलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या विशेष सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्व उमेदवारांने अर्ज मागे घेऊन कार्यकारिणी निवडची सर्व अधिकार पवार यांच्याकडे देण्यात आली. सचिव पदावर एकमत न झाल्याने कार्यकारिणी जाहिर न करण्याचा निर्णय झाला.

विशेष बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, निवडणुक निर्णय अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधिश एस. एन सरदेसाई उपस्थित होते.















