मुळशी औघोगिक वसाहत एमआयडीसीत वर्ग करावी, खासदार सुळेंकडे मुळशी औद्योगिक संघटनेची मागणी

महावार्ता न्यूज: खासदार सुप्रिया सुळे यांनी मुळशी औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
इंडस्ट्रीयल भागात सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा,अंतर्गत रस्ते करण्याबरोबरच ड्रेनेज लाईन आणि पोलीस पेट्रोलिंग हे विषय त्वरित मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. वीज प्रश्नाबाबत येत्या वीज अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हा इंडस्ट्रियल भाग सर्व नियम आणि निकषाचे पालन करत एमआयडीसीमध्ये वर्ग करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी पिरंगुटचे सरंपच चांगदेव पवळे, जे बी केमिकल्सचे श्रीधर जोशी, मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश करंजकर, तानाजी काळे, लक्ष्मीकांत जोशी, सीमा आढाव ,रवींद्र घेवडे पदाधिकारी उपस्थित होते.
See also  मुळशीत आढळले बोगस मतदार, 5 जणांवर गुन्हा दाखल