मुंबईत अवतरला सर्वात उंच लाकडी गजराज, सुबोध मेननांच्या  विक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

महावार्ता न्यूज  :  भारतातील सर्वात उंच लाकडी हत्ती पुतळ्याच्या निर्मिती मुंबईतील डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीचे संस्थापक सुबोध मेनन  केली आहे. या अनोख्या भव्य पुतळ्याची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून  मेनन यांच्या संकल्पनेचे मुंबईसह देशभर कौतुक होत आहे. 
मालाडमधील डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रा. लि. मुख्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळील विराजमान गजराजाचा लाकडी पुतळा आकर्षणाचा केंदबिंदू ठरत आहे. डॉर्फ केटल कंपनीचे संस्थापक सुबोध मेनन यांच्या पुढाकारातून केरळचे कलाकर सूरज नाम्बित यांनी हा भारतातील सर्वात उंच लाकडी 10.5  फूट उंच पुतळा उभा केला आहे. 
महागणी, अंजन, कुन्नी, वागाई आणि लोख चौकटी या विविध प्रकारांच्या लाकडाासून साकार झालेल्या पुतळयाचा  गडद राखाडी रंगाचा साज देण्यात आला आहे. हा पुतळा  केरळमधील सर्वात मोठ्या आकाराचा प्रसिद्ध हत्ती ’पम्बडी राजन’ची प्रतिकृती आहे.
पुतळ्याच्या निर्मितीला जून 2021 पासून   सुरुवात करण्यात आली होती. दोन वर्षांनंतर जून 2023 मध्ये या पुतळा पूर्ण झाला. 31 जानेवारी रोजी या लाकडी हत्तीच्या पुतळयाची नोंद इंडिया बुक रेकॉडमध्ये करण्यात आहे. इंडिया बुकच्या प्रतिनिधी करिश्मा शाह यांनी ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल डॉर्फ केटल कंपनीचे संस्थापक सुबोध मेनन यांना प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरवित केले आहे. 
इंडिया बुक रेकॉर्डमधील विक्रमी कामगिरीनंतर सुबोध मेनन म्हणाले की, चार वर्षांपासून आम्ही हत्तीच्या निर्मितीसाठी प्रयास सुरू केले होते. कोरोनामुळे हा प्रकल्प लांबला. कलांकराना आम्ही भेटलो तेव्हा त्यांना वाटले की 3 ते 4 फूट पुतळा हवा आहे. आम्ही भारतातील सर्वांत उंच लाकडी हत्ती निर्माण करण्याचे सांगितले. अखेर केरळमध्ये गजराज साकार होऊन मुंबईत विराजमान झाले आहेत. या मूर्तीची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड झाल्याचा मोठा आंनद आहे
See also  भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद, सोमवारी 19 फेब्रुवारीला भंडारा