‘आयटी अभियंता’ निकिता वाघमारे यांना हिंजवडी, मारूंजी आयटीतील ग्रामस्थ व आयटीयन्सचा अभूतपूर्व पाठिंबा

आयटीयन्सच्या प्रश्नांसाठी ‘आयटी अभियंता’ निकिता वाघमारे निवडणूक रिंगणात

मुळशी : आयटीयन्सचा खरा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी उच्चशिक्षित आयटी अभियंता निकिता वाघमारे ह्या हिंजवडी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. निकीता यांना हिंजवडी, मारूंजी मधील आयटीतील ग्रामस्थ व आयटीयन्सचा अभूतपर्व पाठिंबा लाभला आहे. नेरे, कारसारसाई, जांबे गावातूनही आमचं मत निकिताताईंना  असा नारा घुमू लागला आहे. 
हिंजवडी आयटी पार्क हे देशातील महत्त्वाचे आयटी केंद्र आहे. मात्र या आयटीत नोकरी करणाऱ्या हजारो आयटी अभियंत्यांना दररोज वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, अपुरी सार्वजनिक वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था, सुरक्षिततेचे प्रश्न आणि मूलभूत नागरी सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांना थेट भिडण्यासाठी आणि निकिता वाघमारे या स्वतः आयटी क्षेत्रातील अभियंता असल्याने, आयटीयन्सच्या अडचणी केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना माहीत आहेत. समस्या ऐकून घेणारा नव्हे, तर समस्या जगलेला प्रतिनिधी हवा, अशी भावना आज हिंजवडीतील तरुण आयटी अभियंत्यांमध्ये व्यक्त होत असून, त्याचा थेट फायदा निकिता वाघमारे यांना मिळताना दिसत आहे. हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई वा परिसराच्या विस्तारामुळे ग्रामस्थांनाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूककोंडी आणि पर्यावरणीय प्रश्न या बाबी ग्रामस्थांसाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत.निकिता वाघमारे यांनी प्रचारादरम्यान ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आयटी पार्कचा विकास झाला, पण गावांचा विकास मागे पडू नये,” ही ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे ग्रामस्थांमध्येही त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून, आयटीयन्स आणि स्थानिक नागरिक यांचा दुर्मिळ असा एकत्रित पाठिंबा त्यांना मिळत आहे.
‘तंत्रज्ञान समजणारी नेतृत्वशैली’ ठरतेय प्लस पॉइंट
आजच्या काळात प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. आयटी पार्श्वभूमी असलेल्या निकिता वाघमारे या समस्या सोडवताना डिजिटल सोल्युशन्स, स्मार्ट प्लॅनिंग आणि पारदर्शक यंत्रणा यावर भर देत आहेत. वाहतूक व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन तक्रार निवारण, सुरक्षिततेसाठी स्मार्ट सोल्युशन्स यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे. त्यामुळे हिंजवडीकरांना टेक्नो-सॅव्ही प्रतिनिधी मिळणारअशी भावना आयटीयन्समध्ये बळावत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासकेंद्रित अजेंडा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासकेंद्रित धोरणांशी निकिता वाघमारे यांची भूमिका सुसंगत असल्याचे चित्र दिसून येते. रोजगार, पायाभूत सुविधा, महिलांची सुरक्षितता आणि युवकांचे प्रश्न यावर पक्षाचा भर असून, निकिता वाघमारे या त्या धोरणांना स्थानिक पातळीवर प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
प्रचारात वाढती गर्दी, वातावरण बदलतेय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात होत असलेल्या प्रचारफेऱ्या, बैठका आणि संवाद कार्यक्रमांना आयटी अभियंते, तरुण-तरुणी आणि ग्रामस्थांची वाढती उपस्थिती दिसून येत आहे. आपल्यातलीच एक व्यक्ती निवडणूक लढवत आहे, ही भावना मतदारांमध्ये तयार होत असून, निवडणुकीचे वातावरण हळूहळू बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

निवडणुकीत नवा ट्रेंड?
आतापर्यंत राजकारणात पारंपरिक चेहरे पाहिले गेले. मात्र यावेळी आयटी अभियंता, तरुण नेतृत्व आणि समस्यांशी थेट जोडलेला चेहरा म्हणून निकिता वाघमारे समोर आल्याने निवडणुकीत नवा ट्रेंड निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे. हिंजवडीतील आयटीयन्सच्या प्रश्नांना विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आवाज मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निकिता वाघमारे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद हे बदलाचे संकेत देत आहे.
आहे.
See also  राष्ट्रीय स्पर्धेत मुळशीच्या आयुषा इंगवलेला कांस्य पदक, सलग पाचव्यांदा गाजवली राष्ट्रीय स्पर्धा