आमदार संग्राम थोपटे या वेळी सरकारच्या गाडीत दिसणार – संजय राऊत, प्रचाराच्या सांगतेत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ मुळशीत धडधडली

महावार्ता न्यूज: कट्टर शिवसैनिक, शरद पवारांची राष्ट्रवादी, निष्ठावंत काॅग्रेस येथे एकत्र आल्याने आमदार संग्राम थोपटे विक्रमी मताधिक्याने निवडून येतीलच, पण या वेळी सरकारच्या गाडीत ते दिसतील असा विश्वास शिवसेनेचे प्रक्क्ते, खासदार संजय राऊत यांनी मुळशीतील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला.
भोर मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ मुळशीत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आज धडधडली. शिवसेनचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रचाराच्या सांगता सभेत विरोधकांचा कडाडून समाचार घेतला.

संपूर्ण मतदारसंघातील 100 पेक्षा अधिक गावात प्रचार करणारा मी एकमेव उमेदवार असल्याचे सांगून उमेदवार संग्राम थोपटे पुढे म्हणाले की, आयात उमेदवार मतदारसंघात अनेक गावातही पोहचता आले नाही. तेथे मी दिलेल्या कामाचा विकास पोहचला आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीचा बालेकिल्लाच राहिल.
आपल्या आक्रमक शैलीत खासदार संजय राऊत यांची मुळशीतील सभा गाजवली
सभेच्या सुरवातीचा विरोधी पक्षाच्या गद्दारावर नाव न घेता टीकास्त्र सोडून राऊत म्हणाले की, तिकिट देणे शक्य नव्हते, कारण हा काॅग्रेसचा बालेकिल्ला आहे. आता तुम्ही मतदारराजा गद्दाराला जागा दाखवून द्याल. इथे गद्दारांचे अन् बेईमनीचे पीक येणार नाही.

मोदी व शहा यांचाही संजय राऊत यांची आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. राऊत म्हणाले, लोकसभेतील मोदींच्या 400 पारला महाराष्ट्राने बूच लावले.
गद्दारांची ही घाण उकरून फेकायची आहे असा प्रहार करीत राऊत शेवटी म्हणाले की, आपल्याला निष्ठावान आमदार निवडून आणायचे आहे, एक एक आमदार महत्वाचा आहे. संग्राम थोपटे निवडून येतीलच पण गतवेळी त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली, या वेळी सरकारच्या गाडीत आमदार थोपटे बसणार आहे
भोर मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा नियोजनबद्ध प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या दिग्गज शरद पवार व संजय राऊत नेत्यांच्या सभा एकाच दिवशी दोन वेगवेगळया तालुक्यात झाल्या. या सभामुळे भोर मतदार संघातील वातावरण थोपटेमय असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुळशीतील घोटावडे फोट्याजवळील सभेत मा. खासदार नानासाहेब नवले, मा. खा. अशोक मोहोळ, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना स्टाईलने झालेल्या या सभेमुळे मुळशीतही संग्राम थोपटे लीड घेतील अशी चर्चा मुळशीत रंगली आहे.
See also  हिंजवडीमध्ये मतदार जनजागृती अभियानास मोठा  प्रतिसाद, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा – सोमा खैरे