महावार्ता न्यूज ः हिंजवडीतील तुळजाभवानी मंदिरात भक्तीमय उत्साहात नवारात्र उत्सव साजरा होत असून परिसरातील आय टी कंपनीच्या अभियंतेची मोठी गर्दी होत आहे. 23 वर्षांपासून शेतकरी कुटुंबातील पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी भव्य मंदिर उभे करून त्यांचे कुटुंब देवीचा मनोभावे सेवा करीत आहेत.
2001 पासून अनेक आय.टी. अभियंते मंदिरात नियमीत येत असून नवरात्रीच्या काळात संध्याकाळी या मंदिराच्या परिसरात भक्तीमय वातावरणाचा अनुभव येत आहे. अनेक संगणकतंज्ञ नाराळाचे तोरणेही अर्पण करतना दिसत असून आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराची शोभाही लक्ष वेधून घेत आहे.
22 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या आयटी नगरी हिंजवडीतील प्रति तुळजापूर असे संबोधल्या जाणार्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला देखील महाराष्ट्राच्या कांना कोपर्यातून भाविक येऊन नवस फेडतात. हिंजवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह खर्या अर्थाने हिंजवडीतील उच्चभ्रू आयटीयन्स कुटुंबीयांची इच्छापूर्ती करणारी देवी अशी ख्याती देवीची आहेत्
निस्सीम भक्तीतून वाघेरे यांनी हे भव्यदिव्य मंदिर उभारले. हे मंदीर श्री क्षेत्र तुळजापूराचे प्रतिरूप आहे. गाभार्यात सव्वा तीन फुटांची काळ्या पाषाणातील मोहक मूर्ती आहे. समोर शिवलिंग आहे मंदिरासमोर मोठी डिकमाळ आहे. तर मागे चिंतामणी आहे तो त्याने दिलेला कौल कधीही चुकीचा ठरत नाही अशी श्रद्धा असल्याने भाविक दर्शनानंतर कौल लावण्यासाठी गर्दी करतात. भक्तांच्या सुविधेसाठी संपूर्ण वाघेरे कुटुंब कायम राबत असते.
रोज सकाळी ९ वाजता व रात्री ७ वाजता आरती.
मंगळवार दी -८/१०/२०२४ रोजी रात्री ७ वा.रेणुका शेंडगे यांचा देवीचा गाण्याचा कार्यक्रम.
शुक्रवार दि -११/१०/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता देवीचा होमहावन.
कोजागिरी पौर्णिमा दि-१७/१०/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आरती
देवीचा जागरण गोंधळ व महाप्रसादाचा कार्यक्रम