पुणे : मुळशीतील लवळे येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालात वाचन संवाद” कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. संवादातील संजय दुधाणे यांच्या अनुभवाने विद्यार्थी भारावले होते.
महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे, यांचे निर्देशानुसार “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत लेखक व विद्यार्थी यांच्यामधील “वाचन संवाद” हा कार्यक्रम
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालात झाला. कार्यक्रमात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, प्रसिद्ध लेखक प्राध्यापक संजय दुधाणे यांनी वाचन संस्कृती जोपसण्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रा. संजय दुधाणे यांनी विविध देशातील ग्रंथालये कशा प्रकारची असतात व तेथील वाचक कसा उस्फूर्त प्रतिसाद देतात यावर सखोल मार्गदर्शन केले. लेखकाच्या मनातून एखादी कथा कादंबरी किंवा चरित्र लिहीले जाते ते वाचकाना मनापासून भावते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल स्क्रिन टाईम कमी करून नियमीत पुस्तक वाचन केले पाहिजे. तसेच लेखनातून निर्माण होणाऱ्या विविध संधी याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांस माहिती दिली. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एन पाटील सर व सिव्हिल विभागप्रमुख डॉ उदय पाटील सर यांचे मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शंकर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उदय पाटकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक यांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सुनिलकुमार पाटील यांनी केले.
कार्यक्रमास इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख प्रा. अतुल वाणी व इंजिनिअरिंग सायन्स विभागप्रमुख डॉ. शिखा भारद्वाज, तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन ग्रंथपाल जयवंत जाधव, प्रा किरण जाधव, तात्यासाहेब मोरे व जितेंद्र यादव यांनी केले.