पिरंगुटमध्ये सातव्या मजल्यावरून पडल्याने पेपर विक्रेतेचा मृत्यू, मदतीसाठी मुळशीकर सरसावले

महावार्ता न्यूज: पिरंगुट (ता.मुळशी) येथील अर्बन ग्राम या गृहनिर्माण सोसायटी मधील सातव्या मजल्यावरून पडल्याने पेपर विक्रेते व कामगार अमित महालिंग आवळे ( वय ३७ ) मृत्यू झाला आहे. आवाळे यांच्या दुदैवी निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून त्यांची कुटुंबियांच्या मदतीला मुळशीत लोक पुढे आले आहे.
अमित आवाळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील असून ते भरे येथील सिमित्सू पॅटर्न या कंपनीत कामाला होते. येथील परिसरात वर्तमान पत्रे वितरणाचेही काम करीत होते.
कै अमित आवाळे यांच्या मागे पत्नी दोन मुलेअसा परिवार आहे त्यांचा दहा वर्षाचा मुलगा रोज त्यांना सकाळी पेपर टाकण्यासाठी मदत करत असे परिवाराच्या मागे कुठेतरी उभे राहण्याची गरज आहे , आपणही सर्वांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सोशल मिडियावर करण्यात आले आहे. याला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत रू. 50 हजार जमा झाले असून अजून मदतीची गरज आहे
See also  आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या आदर्श मंडळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ यंदा थेट मंत्रालयात