खासदार शिंदेचा मुळशीत झंझावाती दौरा, घुमला नारा – भावी आमदार बाळासाहेब चांदेरे

महावार्ता न्यूज: आधी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचा आशिर्वाद आणि आता खासदार श्रीकांत शिंदेचा झंझावाती दौर्यानंतर आता भावी आमदार बाळासाहेब चादेरेच असा नारा घुमत आहे
कोरोना काळात अडीच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी केवल अडीच कोटी रूपये खर्च झाले. परंतू आताच्या युती सरकारच्या काळात अवघ्या चौदा महिन्यात सव्वाशे कोटी रूपये रूग्णसेवेसाठी खर्च करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी पौड (ता. मुळशी) येथे केले. 
पौड येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयासह विविध उपक्रमांचे उद्घाटन करताना शिंदे बोलत होते. यावेळी पक्षप्रतोद भारत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, सचिव बाळासाहेब चौधरी, रमेश कोंडे, किरण साळी, नाना भानगिरे, इरफान सय्यद त्याचप्रमाणे भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक करंजावणे (मुळशी), दशरथ जाधव (भोर), सुनिल शेंडकर (वेल्हा) या तालुकाप्रमुख आणि शिवसैनिकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमस्थळी शिंदे यांच्यावर जेसीबीतून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. तर अडीचशे किलोचा पुष्पहारही घालण्यात आला.
शिंदे पुढे म्हणाले की गेली चौदा महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी सातत्याने धडपडत आहेत. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह संपूर्ण महाराष्ट्रालाही घरात कोंडून ठेवले होते. 75 वर्षावरील वृद्धांना मोफत तर महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली. शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले पाहीजे.
आढळराव पाटील म्हणाले की गेली पंधरा वर्षे खासदार म्हणून काम करताना म्हणावा असा निधी मिळाला नाही. पण गेल्या चौदा महिन्यात माझ्या मतदार संघात मोठी कामे करू शकलो, जी गेल्या पंधरा वर्षात मला करता आली नाही. भोर विधानसभा मतदार संघ शिवसेनेला माननारा आहे. त्यांना वरीष्ठ पातळीवर ताकद दिली गेली पाहीजे. यावेळी भोरचा आमदार शिवसेनेचाच झाला पाहीजे.
बारणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाळासाहेब चांदेरे तळागाळापर्यंत पोचवत आहेत. दिव्यांगाना विविध प्रकारे मदत करण्याचे काम ते करतात. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. गोगावले म्हणाले की या मतदार संघाची बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बाळासाहेब चांदेरे यांना लागेल ते सहकार्य करणार आहोत. मुख्यमंत्र्याच्या कामाला जोड आणि तोड नाही. मुलगी जन्माला आल्यानंतर वयाच्या अठरावर्षांपर्यंत एक लाख एक हजार रूपये हे सरकार देणार आहे. एक रूपयात शेतकऱ्यांना वीमा कवच देत आहे. प्रास्ताविकात चांदेरे म्हणाले की मुळशीतून राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत सत्तर जणांचे बळी गेले आहेत. त्यास येथील आमदार, खासदार जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मुळशीकर उभा राहण्यासाठी आम्ही शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत.
यावेळी शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय, पौडची शिवसेना शाखा, ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरविण्याचा उपक्रम, दिव्यांग कल्याण संस्थेच्या नामफलकाचे उद्घाटन शिंदे यांनी केले. कार्यक्रमस्थळी शिंदे यांच्यावर जेसीबीतून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. तर अडीचशे किलोचा पुष्पहारही घालण्यात आला
See also  बारामती तुपाशी अन् मुळशी उपाशी? मुळशीकरांचे ठरले उमेदवारांना नो वोट, ओन्ली नोटा