मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशनवतीने भूगाव ग्रामपंचायतीचा सन्मान पत्राने गौरव, मुळशीकरांकडून मानले आभार

महावार्ता न्यूज: भुगाव गावठाणातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भूगाव ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने रस्त्या निर्माण केल्याबद्दल मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशनवतीने भूगाव ग्रामपंचायतीचा सन्मान पत्राने गौरव करण्यात आला.

भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.वैशाली सणस, मा. सरपंच निकिता सणस, उपसरपंच दिनेश सुर्वे व पदाधिकारी यांचा मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्या वतीने अध्यक्ष सतीश करंजकर ,सचिव श्री रमण गोवित्रिकर यांनी सन्मान केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी माने भाऊसाहेब, रमेश सणस, मुळशी औघोगिक संघटनेचे सह खजिनदार लक्ष्मीकांत जोशी, पदाधिकारी , सीमा आढाव, श्री .मोरे उपस्थित होते.
राज्यात भूगावच्या शिस्तबद्ध, लोकवर्गणीतून केलेल्या रस्ता निर्मितीचे कौतुक होत असले तरी तालुक्यातील औघोगिक संघटनेकडून झालेले कौतुक मोठा आहे. – सौ. निकीता रमेश सणस, मा. सरपंच
See also  मुळशीत आढळले बोगस मतदार, 5 जणांवर गुन्हा दाखल