वाकडच्या विनोदे कुटुंबियांकडून दातृत्वाचे दर्शन,भंडारा डोंगर मंदिर जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजारांची देणगी

महावार्ता न्यूज: संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यात तीर्थ क्षेत्र भंडारा डोंगरावरील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी तब्बल ११ लाख ११ हजार तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील समाधीस्थळाला भेट देणाऱ्या शिवभक्तांच्या अन्नदानासाठी १ लाखांची देणगी देऊन आनंदाचा क्षण द्विगुणित केलाच शिवाय या दातृत्वाने त्यांनी समाजापुढे एक आगळा आदर्श उभा केला.
बाळासाहेब यांचे सुपुत्र प्रसाद व परंदवाडी येथील संतोष पापळ यांची कन्या नेहा यांचा विवाह सोहळा बुधवारी (ता ३) संपन्न झाला. हा सोहळा ह्या देणगीमुळे चर्चेत व सर्वांच्या स्मरणात राहिला. बाळासाहेब हे वाकडसह संपूर्ण मुळशीत दानशूर व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण समाजाचे काही देणं लागतो या भावानेतून ते रंजल्या-गांजलेल्यांच्या मदतीला धावून जातात. विधवा महिला, दिव्यांग बांधव, गरजू विद्यार्थी यांना ते सढळ हाताने मदत करतात तर त्यांच्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातही त्यांचं नाव आदरान घेतलं जातं.
या सोहळ्याला गुरुवर्य संजयमहाराज पाचपोर, माजी खासदर विदुरा नवले, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, विलास लांडे, चंदकांत मोकाटे, बापूसाहेब भेगडे, शंकर जगताप, आत्माराम कलाटे, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नितीन काळजे, शंकर मांडेकर, संदीप कस्पटे, ॲड सुरेश सब्रद बाळासाहेब काशीद, हभप. पंकज गावडे, चंद्रकांत वांजळे, संतोष पायगुडे, संतिष काळजे, रोहिदास हांडे, शेखर जांभुळकर, जयश्री येवले,माजी महापौर नितिन काळजे, शरद बो-हाडे प्रभाकर वाघिरे,नाना काटे, शंकर मांडेकर, शत्रुघ्न काटे, सुरेश भाईर, राजेंद्र गावडे, विनायक गायकवाड, दिलीप दगडे, अनिल लोखंडे, शांताराम सोनावणे, महादेव कोंढरे, ॲड सुरेश सब्रद, सविता दगडे, मधुरा भेलके, नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंधे,
सुनिता तापकीर, सविता खुळे, मिनल यादव, वर्षा तापकीर, संचालिका शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनावणे, स्वाती भेगडे, शोभा भेगडे, स्वाती हुलावळे, स्वाती ढमाले, रेखा
टिंगरे, रेखा दर्शिले, मिना मांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शब्द रूपी स्वागत व नियोजन नाना शिवले, तुळशीराम घोलप अनिल भुजबळ यांनी केले.
See also  मुंबईत अवतरला सर्वात उंच लाकडी गजराज, सुबोध मेननांच्या  विक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद