डंपरच्या धडकेने पिरंगुटमधील तरूण ठार, पत्नीसह मुलगी गंभीर जखमी, डंपरचा मालक भाजप नेता?

महावार्ता न्यूज: मुळशीतील मुठा खिंडीत भरधाव वेगाने आलेल्या डंपरने चारचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात पिरंगुटमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी व मुलगीही गंभीर जखमी झाल्या आहेत. डंपरचा मालक भाजप नेता असल्याने पोलिसांकडून कारवाईला उशिरापर्यंत झाल्याचा आरोप होत आहे.
विक्रांत हा पत्नी व मुलीसह मुठा खोऱ्यातील वांजळे या त्याच्या सासरवाडीला गेला होता सायंकाळी परत पिरंगुटला येताना मुठा खिंडीतील पारधीबुवा या ठिकाणच्या रस्त्यावर समोरून पुण्याच्या दिशेकडून मुठा गावाकडे भरधाव वेगाने डंपर आला होता. या डंपरने विक्रांतच्या चारचाकीला जोरदार ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पिरंगुट (ता.मुळशी) येथील विक्रांत अण्णा निकटे (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत विक्रांतची पत्नी वैष्णवी व दीड वर्षांची मुलगी या दोघीही जखमी झाल्या आहेत. रविवारी संध्याकाळ पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
See also  मुळशीत वीज चोरीचा दोघांवर गुन्हा दाखल, वीजमीटर रिडींग घेणाराचा ठरला आरोपी