हद्दीबाहेरील खुनाच्या तपासाची पौड पोलिसांची सुपरफास्ट कामगिरी, 5 तासात लागला छडा, 4 जण अटक

महावार्ता न्यूज: सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे – कोलाड महामार्गावरील अनोळखी खून झालेल्या मृतदेहाचा त्याच दिवशी दुपारी 4 पर्यंत तपास करीत अवघ्या 6 तासांत 4 जणांना अटक करण्याची सुपरफास्ट कामगिरी पौड पोलीसांनी केली आहे.
21 डिसेंबरला सकाळी दहा वाजण्याचे सुमारास पुणे – कोलाड महामार्गावरील गोनवडी ता. मुळशी जिल्हा पुणे येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चारीमध्ये एक अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 याचा मृतदेह बेडशीट मध्ये गुंडाळून गळ्याला फास लावून व तोंडावर ठोसे मारून खून करून टाकलेला आढळून आला होता. याबाबत तातडीने शोध आणि तपास करून पाच तासांमध्ये मयत इसमाची ओळख केली. मयत ज्यो परेरा रा. महालक्ष्मी कॉलनी, गुरुद्वारा जवळ, वाकोला, मुंबई याचा तो पत्नीस मारहाण करून शारीरिक छळ आणि लैंगिक शोषण करून त्रास देत असल्याच्या कारणावरून वाकोला येथेच रात्री घरामध्ये खून करून सदरची मयत बॉडी मुंबईहून कार मध्ये पुण्याला आणून ती गोनवडी, मुळशी येथे टाकून दिल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. चार आरोपी आणि मृतदेह आणून टाकण्यासाठी वापरलेली मोटार कार ताब्यात घेण्यात आलेली आहे. अटक आरोपी
(1)अशोक महादेव थोरात, वय 35 वर्ष, रा. टोळे फार्म, एनडीए रोड, वारजे, पुणे. (2) गणेश साहेबराव रहाटे, वय 35 वर्ष, रा. राजीव गांधी नगर, लेन नंबर 1, अप्पर इंदिरानगर, (3) धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंखे, वय 40 वर्ष, रा. घर नंबर 430 हरका नगर,भवानी पेठ, पुणे आणि
(4) योगेश दत्तू माने वय 42 वर्ष, रा. आदित्य गार्डन सिटी मागे, म्हाडा कॉलनी, प्लॉट नंबर 612 वारजे माळवाडी, पुणे यांना सदर गुन्ह्यात अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अटक आरोपींना मा शिवाजीनगर न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही
पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप चव्हाण यांनी केली आहे.
See also  मुळशीत वीज चोरीचा दोघांवर गुन्हा दाखल, वीजमीटर रिडींग घेणाराचा ठरला आरोपी