23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामती शहर सज्ज झाले आहे. 15 ते 19 जानेवारी 2025 कालावधीत बारामतीत कबड्डीचा थरार रंगणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे.

ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा जन्मदिन व राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे  आयोजन करण्यत आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  19 जानेवारी रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार व् क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,मंत्री क्रीडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल.उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभ व स्पर्धा कालावधीत सांस्कृत्तिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीत याची मेजवानी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदिपक लेझर शो स्पर्धेची झळाळी उंचविणार आहेत.


स्पर्धेसाठी  आत्याधुनिक मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असुन प्रेक्षकांच्या करीता  भव्य बैठक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून सायंकाळी 4.00 ते 8.00 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत. 2012 पासून कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, नागपूर, अहमदनगर (अहिल्यानगर) व ठाणे या जिल्ह्यामध्ये  या स्पर्धेचे आयोजन  झालेले आहे. बारामती शहराला दुस-यांदा या क्रीडा स्पर्धा आयोजनांचा बहुमान प्राप्त झालेला आहे  यापुर्वी सन 2009-10 मध्ये या स्पर्धेंचे दिमाखदार आयोजन  बारामती शहराने केलेले होते.

बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडासंस्था, क्रीडासंघटना, क्रीडामंडळांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करावा तसेच दर्जेदार कबड्डी खेळाचा आनंद घ्यावा. – *श्री. जितेंद्र डुडी  छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना रु.44.60 लक्षची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे एकुण 16 महिला व 16 पुरुष असे एकुण 32 संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत एकुण 32 संघामधील खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रीक अधिकारी मिळुन अंदाजे 548 व्यक्ती सहभागी होणार आहेत.पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,पुणे जिल्हा असे एकूण पुणे जिल्ह्याचे 3 संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अधिकची संधी यामुळे प्राप्त होणार आहे.

See also  ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून ऑलिम्पिक पदकाचे पूजन, खेळाडूंना मार्गदर्शन
default

प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत  प्रो कबड्डी स्टार-अजित चौहान ,शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे,दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर  या पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपुर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी पुणे जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना प्राप्त होणार आहे