महावार्ता न्यूज: एकीकडे पौड पोलीसांनी पिरंगुट औघोगिक वसाहतीमधील चोरीचा तपास करीत 3 स्क्रप चोर अटक केले असताना दुसरीकडे भूकूममधील घरफोडीच्या तपासात सुरूवात टाळाटाळ केल्याची घटना मुळशीत घडली आहे.
पिरंगुट येथील के एस सस्पेंशन्स टेक्नाँलाॅजी कंपनी मधील स्क्रॅप यार्ड मधून अँल्युमिनीयम बर (स्क्रॅप) किंमत अंदाजे 65000/- चा माल अज्ञात चोरट्याने चोरीला होता. याबाबत पौड पोलीस स्टेशन येथे गु.र नं. 526/2023 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.नि.मनोज यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह.निवास जगदाळे व पो.ना. सिद्धेश पाटील यांनी तंत्रशुद्ध तपास करून 03 आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील चोरीस गेलेला 65000/- रू चा सर्व माल हस्तगत केला आहे. 1) युवराज विजय सिंग वय 26 वर्षे, 2) गणेश दयालालजी माली वय 21 वर्षे आणि 3) माधवसिंग जब्बर सिंग वय 29 वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
पौड पोलिस एकीकडे सतर्क कामगिरी करीत असताना भुकूममधील भुकूम येथे गट नंबर दोनशे मधील घरामध्ये चोरी झाली. चोरट्याने कॅश आणि सोने चोरून नेले. तक्रारदार पोलिस स्टेशनला गेले असता तुमच्या घरी चोरी झाली आहे तर आम्हाला पावत्या दाखवा हे कारण देऊन त्यांना पुन्हा पिरंगुटला पाठविण्यात आले. अखेर 3 तासांनी पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.